Pune Airport: हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; 'या' आंतरराष्ट्रीय मार्गावरील विमानसेवा रद्द

पुणे: थायलंडच्या सहलीचं नियोजन करणाऱ्या पुणेकरांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. प्रसिद्ध विमान कंपनी 'इंडिगो'ने आपल्या आगामी उन्हाळी हंगामातील पुणे-बँकॉक ही आंतरराष्ट्रीय विमानसेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. २९ मार्चपासून सुरू होणाऱ्या उन्हाळी वेळापत्रकातून इंडिगोने या मार्गावरील बुकिंग पूर्णपणे बंद केले आहे. त्यामुळे पुण्यातील आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीला मोठा धक्का बसला आहे.



सेवा रद्द करण्याचे कारण?



इंडिगोने या निर्णयामागे कोणतेही ठोस कारण दिलेले नाही. कंपनीने केवळ 'कामकाजातील बदल' असे उत्तर दिले आहे. परंतु, हवाई वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, या मार्गावर प्रवाशांच्या अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळत नव्हता. सततच्या कमी प्रतिसादामुळे ही सेवा चालवणे कंपनीला व्यावसायिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने त्यांनी या सेक्टरमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.


आता पुण्याहून बँकॉकला जाण्यासाठी केवळ 'एअर इंडिया एक्सप्रेस' ही एकच कंपनी उपलब्ध असेल. त्यामुळे, या मार्गावर एकाच कंपनीची मक्तेदारी निर्माण झाल्यामुळे विमान तिकिटांचे दर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासोबतच नवीन टर्मिनल सुरू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणे वाढतील अशी अपेक्षा होती. पण चालू सेवा बंद पडणे हे पुणे विमानतळाच्या विस्तारासाठी चिंताजनक आहे.


हवाई वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी सांगितलं की, "विमान कंपन्या प्रत्येक हंगामात प्रवाशांच्या प्रतिसादाचा आढावा घेतात. जर एखाद्या मार्गावर पुरेसे प्रवासी मिळत नसतील, तर व्यावसायिक कारणास्तव सेवा रद्द केली जाते. कदाचित ही कंपनी आता दुसऱ्या फायदेशीर मार्गावर आपली विमाने वळवेल."


सध्या पुणे विमानतळावरून दुबई, अबुधाबी आणि बँकॉक या तीनच आंतरराष्ट्रीय शहरांसाठी सेवा उपलब्ध आहेत. इंडिगोच्या या निर्णयामुळे पर्यटनासाठी बँकॉकला जाणाऱ्या पुणेकरांच्या खिशाला आता मोठी कात्री लागण्याची चिन्हे आहेत.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी