हेटमायर आणि पॉवेलमुळे वेस्ट इंडिजने ओलांडला २५० धावांचा टप्पा

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर ८ फेरीत वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजने हेटमायर आणि पॉवेलच्या फटकेबाजीच्या जोरावर २५० धावांचा टप्पा ओलांडला. विंडीजने २० षटकांत सहा बाद २५४ धावा केल्या.


शिमरॉन हेटमायरने ३४ चेंडूत ७ षटकार आणि ७ चौकार मारत ८५ तर रोवमन पॉवेलने ३५ चेंडूत ४ षटकार आणि ४ चौकार मारत ५९ धावा केल्या.


वेस्ट इंडिजकडून ब्रँडन किंगने ९, शाई होपने १४, हेटमायरने ८५, पॉवेलने ५९, शेरफेन रुदरफोर्डने नाबाद ३१, रोमारियो शेफर्डने २१, जेसन होल्डरने १३, मॅथ्यू फोर्डेने नाबाद १ धावांचे योगदान दिले. झिम्बाब्वेने २१ अवांतर चेंडू टाकले. विंडीजच्या फलंदाजांनी झिम्बाब्वेच्या सर्व गोलंदाजांची धुलाई केली. झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुजराबानी आणि रिचर्ड नगारावाने प्रत्येकी २ तर ग्रॅमी क्रेमर आणि ब्रॅड इव्हान्सने प्रत्येकी १ विकेट घेतली.


वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे या सामन्यातील विजेता उपांत्य फेरीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकणार आहे. विशेष म्हणजे वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांना सुपर ८ फेरीत आणखी प्रत्येकी दोन सामने खेळायचे आहेत. यामुळे मुंबईत जिंकणाऱ्या संघाची बाजू पुढे जाण्याच्या दृष्टीने मजबूत होण्यास मदत होणार आहे. सध्या सुपर ८ च्या ग्रुप १ मध्ये भारताविरुद्ध जिंकल्यामुळे दक्षिण आफ्रिका अव्वलस्थानी आहे. भारत चौथ्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांचे स्थान मुंबईतल्या सामन्याच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.


शेवटच्या षटकांत १८ धावा


विंडीजच्या फलंदाजांनी झिम्बाब्वे विरुद्ध खेळताना २० व्या षटकांत १८ धावा केल्या. शेवटच्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर जेसन होल्डरने ब्लेसिंग मुजराबानीला दोन उत्तुंग षटकार मारले. यानंतर तिसऱ्या चेंडूवर जेसन होल्डरला ब्लेसिंग मुजराबानीने टोनी मुनयोंगाकरवी झेलबाद केले. नंतर फलंदाजीसाठी आलेल्या मॅथ्यू फोर्डने ब्लेसिंग मुजराबानीच्या चौथ्या चेंडूवर एक धाव घेतली. पाचवा चेंडू वाइड गेला. यानंतरच्या चेंडूवर एकही धाव मिळाली नाही. अखेरच्या चेंडूवर रुदरफोर्डने चौकार मारला.


महत्त्वाचे




  • टी-२० विश्वचषकात सर्वाधिक वैयक्तिक षटकार
    १. १७* - शिमरॉन हेटमायर (२०२६)
    २. १७ - निकोलस पूरन (२०२४)
    ३. १६ - ख्रिस गेल (२०१२)
    ४. १६ - रहमानउल्लाह गुरबाज (२०२४)

  • टी-२० मध्ये २५० पेक्षा जास्त धावा
    ४ - भारत
    ३ - झिम्बाब्वे
    ३ - वेस्ट इंडिज

  • टी-२० विश्वचषकात सर्वाधिक धावा
    १. २६०/६ - श्रीलंका विरुद्ध केनिया, जोबर्ग, २००७
    २. २५४/६ - विंडीज विरुद्ध झिम्बाब्वे, वानखेडे, २०२६*
    ३. २३५/५ - आयर्लंड विरुद्ध ओमान, कोलंबो एसएससी, २०२६
    ४. २३०/८ - इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, वानखेडे, २०१६
    ५. २२९/४ - दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, वानखेडे, २०१६
    ६. २२५/५ - श्रीलंका विरुद्ध ओमान, पल्लेकेले, २०२६

  • विंडीजने झिम्बाब्वे विरुद्दच्या सामन्यात २० षटकांत मारले १९ षटकार

  • हेटमायरने १९ चेंडूत झिम्बाब्वे विरुद्ध अर्धशतक केले

  • वर्ल्डकपमध्ये विंडीजसाठी सर्वाधिक वेगाने अर्धशतक करणाऱ्यांमध्ये हेटमायर अव्वल

  • वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक वेगाने अर्धशतक करणाऱ्यांमध्ये हेटमायर आणि दक्षिण आफ्रिकेचा एडेन मर्कराम संयुक्तपणे पहिल्या स्थानी. दोघांनी प्रत्येकी १९ चेंडूत केले अर्धशतक. भारताच्या ईशान किशनने नामिबियाविरुद्ध २० चेंडूत तर इंग्लंडच्या विल जॅक्सने इटलीविरुद्ध २१ चेंडूत अर्धशतक केले होते.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून