Tahawwur Rana : कुख्यात दहशतवादी तहव्वुर राणाचे कॅनडियन नागरिकत्व रद्द होणार

कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या प्रस्तावित भारत दौऱ्यापूर्वी कॅनडियन सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. कॅनडियन सरकारने २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यांचा मुख्य आरोपी तहव्वुर हुसेन राणा याच्याबाबत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कॅनडातील मीडिया अहवालानुसार, कॅनडा सरकारने राणाची कॅनडियन नागरिकत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.


अहवालानुसार, कॅनडाच्या ‘इमिग्रेशन, रिफ्युजीज अँड सिटिझनशिप कॅनडा’ (आयआरसीसी) या विभागाने राणाला त्याचे कॅनडियन नागरिकत्व रद्द करण्याचा मानस असल्याची औपचारिक सूचना दिली आहे. मात्र ही कारवाई थेट दहशतवादाच्या आरोपांशी संबंधित नसून, नागरिकत्वासाठी अर्ज करताना दिलेल्या कथित चुकीच्या माहितीसंबंधी आहे.


राणा १९९७ मध्ये कॅनडात गेला आणि २००१ मध्ये त्याला कॅनडियन नागरिकत्व मिळाले. आयआरसीसीनुसार, ३१ मे २०२४ रोजी पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आले की, राणाने नागरिकत्वासाठी अर्ज करताना कॅनडातील वास्तव्यासंदर्भात चुकीची माहिती दिली होती. २००० साली अर्ज करताना त्याने चार वर्षे ओटावा आणि टोरोंटो येथे वास्तव्य केल्याचा दावा केला होता. त्या काळात फक्त सहा दिवस अनुपस्थित राहिल्याचे त्याने नमूद केले होते.


मात्र ‘रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिस’ (आरसीएमपी) यांच्या तपासात तो बहुतेक काळ अमेरिकेतील शिकागो येथे असल्याचे उघड झाले. तेथे त्याच्या अनेक मालमत्ता होत्या आणि तो इमिग्रेशन सल्लागार सेवा तसेच इतर व्यवसाय चालवत होता. हे प्रकरण सध्या कॅनडाच्या ‘फेडरल कोर्ट’मध्ये प्रलंबित आहे. इमिग्रेशन विभागाच्या प्रवक्त्यानुसार, चुकीची माहिती देऊन मिळवलेले नागरिकत्व रद्द करणे ही सरकारच्या प्रक्रियेची विश्वासार्हता टिकवण्यासाठी आवश्यक कारवाई आहे.


पाकिस्तानी मूळ असलेल्या ६५ वर्षीय तहव्वुर हुसेन राणा सध्या भारतातील कारागृहात असून, २००८ मधील मुंबई दहशतवादी हल्ल्यांमध्ये मदत केल्याच्या आरोपांवर त्याच्यावर खटला चालवण्यात येणार आहे. राणावर डेविड कोलमन हेडली आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा तसेच हरकत-उल-जिहादी इस्लामीशी संबंधित दहशतवाद्यांसोबत मिळून २००८ च्या मुंबई हल्ल्यांची कटकारस्थान रचल्याचा आरोप आहे. २६/११ च्या हल्ल्यांत अधिकृत आकडेवारीनुसार १६६ जणांचा मृत्यू झाला होता, तर शेकडो जखमी झाले होते.


अमेरिकेत अटकेनंतर भारताने त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. प्रत्यार्पण थांबवण्यासाठी राणाने अमेरिकन न्यायालयांपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली, मात्र त्याच्या सर्व याचिका फेटाळण्यात आल्या. एप्रिल २०२५ मध्ये त्याला भारतात आणण्यात आले आणि ‘राष्ट्रीय तपास यंत्रणा’ (एनआयए) ने त्याला अटक केली. मार्क कार्नी यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उचललेले हे पाऊल भारत-कॅनडा संबंधांच्या दृष्टीनेही महत्त्वाचे मानले जात आहे.

Comments
Add Comment

Russia Ukraine War : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीयासह १२ जणांचा मृत्यू

कीव्ह : रशियाने युक्रेनवर रात्रभर केलेल्या भीषण हवाई हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा आणि इतर ११ जणांचा अशा एकूण १२

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऐतिहासिक बिश्केक जाहीरनाम्यावर स्वाक्षरी

बिश्केक : २६ व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेत मंगळवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

USS Abraham Lincoln : थायलंडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! ५ हजार अमेरिकन सैनिकांच्या आगमनापूर्वी पटायातील देहव्यापारावर धाडी

पटाया : थायलंडचे प्रसिद्ध पर्यटन शहर असलेल्या पटाया (Pattaya) मध्ये सध्या पोलिसांकडून देहविक्री करणाऱ्या महिला आणि

PM Modi SCO Summit 2026 : दहशतवादावर पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला थेट संदेश; ‘दहशतवादाबाबत दुहेरी मापदंड नको’

बिश्केक : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) २६व्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी

Nepal Flood Rescue : नेपाळ-तिबेट पुरानंतर महाराष्ट्रातील ६७ नागरिकांशी संपर्क नाही; शोधासाठी केंद्राचे विशेष पथक काठमांडूत दाखल

नेपाळ-तिबेट परिसरात २६ ऑगस्ट रोजी आलेल्या विनाशकारी पुरानंतर महाराष्ट्रातील ६७ नागरिकांशी अद्याप संपर्क होऊ

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही