इराणशी लढण्याआधी अमेरिकेच्या सैनिकांमध्ये भर समुद्रात टॉयलेटवरून मारामारी

वाशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यातील वाद काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. अमेरिकेने आपल्या युद्धनौका इराणच्या दिशेने रोखल्या आहेत. अमेरिका इराणवर हल्ला करण्याच्या संपूर्ण तयारीत आहेत पण भर समुद्रात लढाईला जायच्या आधीच जगातील मोठ्या युद्धनौकेवर अमेरिकेच्या सैनिकांमध्येच एक वेगळंच युद्ध रंगलय ते म्हणजे 'टॉयलेट वॉर'.


यूएसएस जेराल्ड आर. फोर्डवरील बहुतांश स्वच्छतागृह तुंबली आहेत. त्यामुळे सैनिकांची अवस्था बिकट झाली आहे. युद्धनौकेवर ४५०० पेक्षा अधिक सैनिक आहेत. त्यामुळे नौदलातील सैनिकांना दररोज ४५ मिनिटं रांग लागली आहे. युद्धनौकेवरील मलनिस्सारण यंत्रणा पूर्णत: नादुरुस्त झाली आहे. यूएसएस जेराल्ड आर फोर्ड जून २०२५ पासून समुद्रात तैनात आहे. जानेवारीत याच युद्धनौकेनं व्हेनेझुएलाविरुद्धच्या कारवाईत अमेरिकेसाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अमेरिकेनं सैन्यानं व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केली होती. आता इराण सोबतचा तणाव वाढलेला असताना अमेरिकेनं हीच युद्धनौका मध्य पूर्वेत तैनात केली आहे.


इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढत असताना युद्धनौकेवर सैनिकांसाठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. शौचालयं तुंबल्यानं सैनिकांसाठी अवघड स्थिती आहे. जगातील सर्वात महागड्या युद्धनौकेवर जवळपास ६५० शौचालयं आहेत. यातील बहुतांश स्वच्छतागृहं वापरण्याच्या स्थितीत नाहीत. वॉल स्ट्रीट जर्नलनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. युद्धनौका दीर्घ काळापासून समुद्रात आहे. त्यामुळे युद्धनौकेची नियमित देखभाल झालेली नाही.


स्वच्छतागृहांची संख्या कमी असल्यानं सैनिकांना दररोज पाऊण तास रांगेत उभं राहावं लागत आहे. प्लंबर, डागडुजीचं काम करणारे कामगार आणि सैनिकांमध्ये दररोज शा‍ब्दिक चकमकी झडत आहेत. तंत्रज्ञ दररोज १९ तास काम करत आहेत. यंत्रणा नीट करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. विशेष म्हणजे अशी समस्या पहिल्यांदाच निर्माण झालेली नाही. गेल्या वर्षी मार्चमध्ये अवघ्या चार दिवसांमध्ये २०५ स्वच्छतागृहं खराब झाली होती.


जहाजावर अत्याधुनिक सुविधा आहेत. पण ही युद्धनौका एका नाजूक व्हॅक्यूम आधारित मलनिस्सारण यंत्रणेवर चालते. एखादा वॉल्व खराब झाल्यास त्या विभागातील सर्व शौचालयं बंद करावी लागतात. कॅल्शियम तुंबल्यानं पाईप जाम होतात आणि अडचण निर्माण होते. प्रत्येक वेळी यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी ऍसिड फ्लशवर जवळपास ४ लाख डॉलर खर्च करावे लागतात.


युद्धनौकेवर निर्माण झालेली समस्या तांत्रिक स्वरूपाची आहे. ही युद्धनौका जगातील सर्वात मोठी अत्याधुनिक नौका आहे. अश्या युद्धनौकेवर लढाईला जाताना भर समुद्रात अशी परिस्तिथी निर्माण होणे हे भयंकर आणि तितकेच हास्यास्पदही आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे