Beed News: दोन बहिणींनी अपहरणाचा कट लावला उधळून

बीड: महिला अत्याचाराच्या घटना राज्यात कुठे ना कुठे होत आहेत. त्यात बीडमध्ये दिवसा-ढवळ्या दोन तरुणींच्या अपहरणाची बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही सख्ख्या बहिणी होत्या. बीडच्या माजलगावमध्ये ही घटना घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र या दोन बहिणी मधील लहान बहिणीने दाखवलेलं धाडस आणि प्रसंगावधान कौतूक करण्या सारखेच आहे. त्यामुळे अपहरणाचा डाव उधळला गेला. दोन्ही तरुणी या सुरक्षित आपल्या घरी ही परतल्या.


बीड जिल्ह्यात गुन्हेगारीची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. माजलगाव शहरात दिवसाढवळ्या दोन सख्ख्या बहिणींच्या अपहरणाचा थरार उघडकीस आला आहे. सुंदरराव सोळंके महाविद्यालयासमोर तीन आरोपी उभे होते. त्यांचा या दोन बहिणींच्या अपहरणाचा डाव होता. दोन्ही मुली ज्या वेळी त्यांच्या समोर आल्या त्यावेळी या तिघांनी ही त्यांच्यावर झडप टाकली. त्यांना जबरदस्तीने कारमध्ये कोंबण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी लहान बहिणीने डोकं लावलं. तिने त्यांना प्रतिकार केला.


शिवाय जोरजोरात आरडाओरड केला. त्यामुळे तिथे एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मुलींना कारमध्ये टाकायचे आणि पळ काढायचा असा त्यांचा डाव होता. पण त्यांच्या मनासारखे काही झाले नाही. लहान बहिणीने जबर प्रतिकार आणि आरडाओरडा केला. तो ऐकून तिथं नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. त्यांना हा प्रकार काही तरी भयंकर असल्याचं जाणवलं. नागरिक मदतीला धावले आणि अपहरणकर्त्यांचा डाव उधळला.


त्यानंतर संतप्त नागरिकांनी आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तिघांना अटक करून त्यांचे वाहन ही जप्त केले आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे माजलगावमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. दरम्यान कौटुंबिक कलहातून हा कट रचला गेला होता हे तपासात समोर आले आहे. याबाबत बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी माहिती दिली आहे. तर सामाजिक कार्यकर्ता सायली पवार यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी उपाय योजना होणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण