Donald Trump Pakistan PM : "मी नसतो तर पाकिस्तानी पंतप्रधानांचा..."; ऑपरेशन सिंदूरवर डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑपरेशन सिंदूर संदर्भात एक मोठे विधान केले आहे. "जर मी नसतो तर या सिंदूर ऑपरेशनमध्ये पाकिस्तानी पंतप्रधानांचा मृत्यू झाला असता." असं विधान ट्रम्प यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.



नेमकं काय म्हणाले ट्रम्प ?


डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की त्यावेळी म्हणजेच ऑपरेशन सिंदूरच्या वेळी परिस्थिती वेगाने बिघडत होती आणि ती नियंत्रणाबाहेर जाऊ शकली असती. जर त्यांनी हस्तक्षेप केला नसता तर त्याचे परिणाम भयानक झाले असते असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यावेळी पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सुरक्षेलाही धोका होता असेही त्यांनी सांगितले.



'लाखो जीव वाचले' : 


ट्रम्प यांनी त्यांच्या निवेदनात असाही दावा केला की त्यांच्या राजनैतिक पुढाकारांमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी टाळता आली. त्यांनी सांगितले की त्यांच्या वाटाघाटी आणि हस्तक्षेपामुळे अंदाजे ३५ दशलक्ष लोकांचे जीव वाचले. त्यांनी असाही दावा केला आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ही परिस्थिती अणु संघर्षाकडे जात होती, परंतु ती वेळीच रोखण्यात आली.





राजनयिकतेने एक मोठे संकट टाळले : 


ट्रम्प यांच्या मते, त्यांनी दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी संवादाचा मार्ग स्वीकारला आणि यामुळे परिस्थिती हळूहळू सामान्य होऊ लागली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दाव्याला इतर देशांनी अधिकृतपणे दुजोरा दिलेला नसला तरी, ट्रम्प यांचे विधान आंतरराष्ट्रीय राजकारणात चर्चेचा विषय बनले आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे