कधी आहे नृसिंह द्वादशी ? त्या दिवशी नेमके काय करावे ?

भगवान विष्णूचा चौथा अवतार म्हणजेच भगवान नृसिंह यांची द्वादशी ही यंदा शुक्रवार २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी दहा वाजून ३२ मिनिटांनी सुरू होत आहे आणि शनिवार २८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री आठ वाजून ४३ मिनिटांनी संपेल. यामुळे यंदा नृसिंह द्वादशी ही शनिवार २८ फेब्रुवारी २०२६ रोजी साजरी केली जाईल. याच दिवशी नृसिंह द्वादशीचा उपवास असेल. रविवार १ मार्च २०२६ रोजी नृसिंह द्वादशीटा उपवास सोडला जाईल. उपवास सोडण्यासाठी १ मार्च रोजी सकाळी सहा वाजून २१ मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून ४१ मिनिटांपर्यंतचा काळ हा शुभ आहे.


मनापासून केलेले नृसिंह द्वादशीचे व्रत लाभदायी ठरते. असे सांगतात की, हे व्रत केल्यामुळे जीवनातील भीती, चिंता आणि अडथळे दूर होतात. धाडस करण्यासाठी हिंमत वाढते. आत्मविश्वास वाढतो. जीवनात सकारात्मक ऊर्जा येते. शत्रूचा बंदोबस्त करण्यासाठी सामर्थ्य लाभते. माणूस मानसिकदृष्ट्या कणखर होतो.


व्रत कसे करावे ?


नृसिंह द्वादशीच्या दिवशी सूर्योदयाच्या आधी उठावे. स्नान करुन धूत वस्त्र अथवा सोवळे नेसावे. नृसिंहाच्या प्रतिमेची अथवा मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजा करावी. यानंतर, विष्णू सहस्रनाम,नृसिंह स्तोत्र, भगवान विष्णूची आरती, भगवान नृसिंहाची आरती करावी. देवाला प्रसाद दाखवून नंतर सर्वांना वाटावा आणि देवाचे स्मरण करत ग्रहण करावा.


श्रीनृसिंहाची आरती


कडकडिले स्तंभ गडगडिलें गगन।
अवनी होत आहे कंपायमान।
तडतडलीं नक्षत्रे पडताती जाण।
उग्ररूपें प्रगटे सिंहवदन।। १ ।।

जय देव जय देव जय नरहरिराया।
आरती ओवाळू महाराजवर्या।
जय देव जय देव ।।
एकविस स्वर्गमाळा डळमळली कैसी।
ब्रह्मयाच्या वाटे अभिनव चित्तासी।
चंद्रसूर्य दोनी लोपति प्रकाशीं।
कैलासीं शंकर दचके मानसीं।। २ ।।

जय देव जय देव जय नरहरिराया।
आरती ओवाळू महाराजवर्या।
जय देव जय देव ।।
थरथरती त्या जटा जिव्हा लळलळित।
तीक्ष्ण नखांनीं दैत्य तो विदारीत।
अर्धांगी कमलजा शिरीं छाया धरित।
माधवदासा स्वामी नरहरि शोभत।। ३ ।।

जय देव जय देव जय नरहरिराया।
आरती ओवाळू महाराजवर्या।
जय देव जय देव ।।


अस्वीकरण / Disclaimer : माहिती संकलित आहे. प्रयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे.

Comments
Add Comment

Nashik Crime : गोंदे एमआयडीसीतील गोळीबाराचा छडा; पाच जण ताब्यात, गावठी कट्ट्यासह शस्त्रे जप्त

नाशिक : वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोंदे एमआयडीसी परिसरात झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणाचा स्थानिक

World Heart Day : सावधान! हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर देते 'हे' गंभीर संकेत; वेळेवर ओळखा लक्षणे

World Heart Day : आज 29 सप्टेंबर रोजी जगभरात जागतिक हृदय दिन (World Heart Day) साजरा केला जातो. हृदयाच्या आरोग्याबाबत जनजागृती करणे आणि

Nashik : १,३८० ग्रामपंचायतींमध्ये ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान ! ३१ मार्चपर्यंत पूर्वतयारी पूर्ण करण्याचे निर्देश; १ एप्रिलपासून प्रत्यक्ष अंमलबजावणी

Nashik : ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्यमान उंचावण्यासाठी आणि तळागाळातील नागरिकांना दर्जेदार प्राथमिक

Mumbai Music Festival : दादरमध्ये तीन दिवस सुरांची बरसात! २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान रंगणार ‘गायन वादन महोत्सव’

मुंबई : संगीतप्रेमी रसिकांसाठी मुंबईत तीन दिवसीय ‘गायन वादन महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र

Nashik : अन्न भेसळीवर प्रशासनाचा पंचवटीत दणका; सणासुदीआधी तीन लाखांचा साठा जप्त

Nashik : सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध

अजित आगरकर निवड समितीवरून गेले तर गिलच्या टीमचं काय होणार? वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेपूर्वी नवा पेच

भारतीय संघ पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेची तयारी करत आहे. या स्पर्धेसाठी शुभमन गिलच्या