Nashik : १,३८० ग्रामपंचायतींमध्ये ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान ! ३१ मार्चपर्यंत पूर्वतयारी पूर्ण करण्याचे निर्देश; १ एप्रिलपासून प्रत्यक्ष अंमलबजावणी

Nashik : ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्यमान उंचावण्यासाठी आणि तळागाळातील नागरिकांना दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत १ एप्रिल २०२६ पासून ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नाशिक जिल्हा परिषद सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील १,३८० ग्रामपंचायतींमध्ये हे अभियान लोकचळवळीच्या रूपात राबवून ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या ध्येयाशी सुसंगत आरोग्य क्षेत्रात जिल्ह्याला आदर्श बनविण्याचा संकल्प करण्यात आला. अभियानाची ३१ मार्चपर्यंत सर्व पूर्वतयारी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.



अभियानाचे उद्दिष्ट


‘प्रजा निरोगी, तर राज्य सशक्त’


प्रत्येक नागरिकाला घराजवळ सर्वसमावेशक, मोफत व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा.


आरोग्याला ग्रामविकासाच्या केंद्रस्थानी आणणे.


१,३८० ग्रामपंचायतींमध्ये लोकचळवळीद्वारे आरोग्यविषयक उपक्रम राबविणे.


३१ मार्चपर्यंत पूर्वतयारी पूर्ण करून १ एप्रिलपासून अभियानाची प्रभावी अंमलबजावणी.


"ग्रामीण भागात आरोग्याची मोठी चळवळ उभी करण्याची गरज आहे. आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी आघाडीवर राहून काम करावे. सामूहिक प्रयत्नांतून नाशिक जिल्ह्याला अभियानातील स्पर्धा व गुणांकनात राज्यपातळीवर उच्च स्थानी नेण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहावे असे डॉ. जयंत आडे (भा.प्र.से.) यांनी म्हटले आहे.


Comments
Add Comment

Mumbai Music Festival : दादरमध्ये तीन दिवस सुरांची बरसात! २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान रंगणार ‘गायन वादन महोत्सव’

मुंबई : संगीतप्रेमी रसिकांसाठी मुंबईत तीन दिवसीय ‘गायन वादन महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र

Nashik : अन्न भेसळीवर प्रशासनाचा पंचवटीत दणका; सणासुदीआधी तीन लाखांचा साठा जप्त

Nashik : सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध

अजित आगरकर निवड समितीवरून गेले तर गिलच्या टीमचं काय होणार? वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेपूर्वी नवा पेच

भारतीय संघ पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेची तयारी करत आहे. या स्पर्धेसाठी शुभमन गिलच्या

Nashik : नावीन्यपूर्ण उपक्रम राबवा, प्रभावी दस्तऐवजीकरण करा, आयुष प्रसाद यांचे आवाहन

Nashik : प्रशासन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि परिणामकारक करण्यासाठी प्रत्येक विभागाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून

Short Circuit : लालबागच्या राजाच्या मंडपात मुखदर्शनाच्या रांगेत शॉर्टसर्किट; भाविकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण   

Ramesh Pawar : मनात कलेचा ध्यास, हातात सर्जनशीलता अन् हृदयात श्रद्धा; रमेश पवारांच्या घरात साकारलं त्र्यंबकेश्वर मंदिर!

नाशिक : परिस्थिती कितीही साधी असली, तरी मनात काहीतरी करण्याची जिद्द आणि नवी कल्पना साकारण्याची इच्छा असेल, तर