भारतीय संघ पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेची तयारी करत आहे. या स्पर्धेसाठी शुभमन गिलच्या नेतृत्वात संघाची बांधणी सुरू आहे. असं असताना निवड समितीत बदलाचे वारे वाहत आहेत. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांचा कार्यकाळ संपला आहे. मात्र अजूनही त्यांचा कार्यकाळ वाढवण्याबाबत बीसीसीआयने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे अजित आगरकर राहणार की जाणार? हा पहिला प्रश्न आहे. खरं तर त्यांचा कार्यकाळ वाढण्याचा सर्वस्वी निर्णय हा बीसीसीआयच्या हाती आहे. पण अजूनही याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे त्यांच्या जागी नव्या व्यक्तीचा शोध सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. पार्थिव पटेल किंवा प्रज्ञान ओझा यांचा पर्याय बीसीसीआयपुढे आहे. पण हा बदल झाला तर शुभमन गिलच्या संघावर काय परिणाम होणार? हा देखील प्रश्न आहे. कारण वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेला आता फक्त काही महिने शिल्लक आहेत. अशा स्थितीत संघ बांधणी वेळेत पूर्ण होणं गरजेचं आहे.
नवा गडी नवा राज्य!
अजित आगरकर यांच्या जागी एखाद्या नव्या व्यक्तीची वर्णी लागली तर त्याची विचार करण्याची पद्धत तशीच असेल असं नाही. त्याचं क्रिकेटबाबत बघण्याचा दृष्टीकोन आणि आकलन आपसूक वेगळं असणार आहे. युवा खेळाडूंबाबत एक वेगळं मत असू शकते. तसेच 2027 वनडे वर्ल्डकपसाठी संघ बांधणी करणं हा मुख्य उद्देश असणार आहे. त्यामुळे सध्याच्या वनडे संघात काही बदल पाहायला मिळाले आश्चर्य वाटायला नको. कर्णधार गिलच्या संघात कोण असेल? कोण बाहेर जाईल?कोणत्या युवा खेळाडूला संधी मिळेल? आणि वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी संघ बांधण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? हे प्रश्न या निमित्ताने पुढे येतील.
भारत आणि जापान यांच्यात एकमेव टी20 सामना नुकताच पार पडला. या सामन्यात भारताने जापानला 2 धावांनी पराभवाची धूळ चारली. एक वेळ अशी होती की हा सामना भारतीय संघ ...
फलंदाजांचं गणित कसं असेल?
वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी संघाची बांधणी करताना सर्वात आघाडीवर असलेला प्रश्न म्हणजे फलंदाजी.. गिलच्या नेतृत्वात नवी फलंदाजी लाइनअप तयार होईल का? रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या पुढचा विचार करून नवा संघ बांधावा लागेल. या संघाचा कणा कोण असेल? इतकंच काय तर यशस्वी जयस्वालला संधी मिळेल का? यशस्वी जयस्वालला संघात सहभागी केलं तर फलंदाजीचा संपूर्ण क्रम बदलण्याची वेळ येईल. यासाठी ओपनिंगपासून मधल्या फळीपर्यंतचं गणित बदलून जाईल.
अष्टपैलू खेळाडू आणि फिरकीची धुरा!
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेच्या दृष्टीने संघात तगडे अष्टपैलू खेळाडू असणं गरजेचं आहे. दक्षिण अफ्रिकेत आघाडीचे फलंदाज फेल गेले तर अष्टपैलू खेळाडूंवर जबाबदारी येईल. असं असताना हार्दिक पांड्याचा फिटनेस आणि त्याची कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे. दुसरीकडे, फिरकीसाठी रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे दोन पर्याय आहे. त्यामुळे या दोघांपैकी एकाही निवड करणं आणि एकाला डावलणं हे देखील कठीण आहे. तर वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर असेल. मात्र त्याच्या सोबतीला कोण? हा देखील प्रश्न आहे. त्यामुळे निवड समिती अध्यक्ष बदलताच हे सर्व प्रश्न अधोरेखित होणार आहेत.