Budget Session : आरोग्य केंद्रात आता 'कायाकल्प'; ४६ पैकी २८ केंद्रांचा कायापालट होणार, मंत्री बोर्डीकर यांचे आश्वासन

मुंबई : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे घडलेल्या प्रसूती प्रकरणाचे पडसाद आज (२६ फेब्रुवारी) विधानपरिषदेत उमटले. आमदार प्रवीण दरेकर यांनी डहाणूतील आरोग्य केंद्रांमधील अपुऱ्या सुविधा, डॉक्टरांची अनुपस्थिती आणि रिक्त पदांबाबत सरकारला धारेवर धरले. याला उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दोषींवर कडक कारवाई केल्याची आणि रिक्त पदे भरण्यासाठी विशेष पावले उचलल्याची घोषणा केली.


प्रवीण दरेकर यांनी आरोग्य केंद्राच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. "आशागड प्राथमिक आरोग्य केंद्रात ३८ हजार आदिवासी लोकसंख्या असतानाही डॉक्टर का नसतात? परिचारिकांनी प्रसूती करणे हे रुग्णांच्या जीवाशी खेळणे नाही का?" असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. तसेच, मागील वर्षभरात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तवणुकीच्या किती तक्रारी आल्या आणि त्यावर काय चौकशी केली, असा जाबही त्यांनी विचारला. यासोबतच त्यांनी पालघर जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदांचा मुद्दाही मांडला.


आमदार दरेकर यांच्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री मेघना बोर्डीकर यांनी माहिती दिली की, सुदैवाने माता आणि बालकाची प्रकृती स्थिर आहे. मात्र, या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेता, आशागड केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याचे (MO) तातडीने निलंबन करण्यात आले आहे, तर कंत्राटी तत्त्वावरील दोन डॉक्टरांची सेवा खंडित (Terminate) करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी २७ फेब्रुवारी पासून नवी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, ज्यामुळे रिक्त पदांचा प्रश्न सुटेल. पालघरमध्ये नवीन २०० खाटांचे जिल्हा रुग्णालय, १०० खाटांचे स्त्री रुग्णालय आणि क्रिटिकल केअर ब्लॉकला मंजुरी मिळाली असून त्याचे काम लवकरच पूर्ण होईल. तसेच, ४६ पैकी २८ प्राथमिक आरोग्य केंद्रे ही 'कायाकल्प' योजनेसाठी पात्र ठरली असून तेथे दर्जेदार सुविधा दिल्या जात आहेत.

Comments
Add Comment

Hindi Exam : सरकारी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करणारा निर्णय रद्द

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी ‘हिंदी भाषा

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली