Budget Session : पोलादपूर एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागणार; अधिवेशन काळातच विशेष बैठकीचे आयोजन

मुंबई : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे औद्योगिक वसाहत (MIDC) स्थापन करण्याच्या मागणीने आता जोर धरला आहे. भाजप गटनेते आणि पोलादपूरचे सुपुत्र आमदार प्रवीण दरेकर यांनी आज (२६ फेब्रुवारी) विधानपरिषदेत या प्रश्नावर विचारणा केली. पोलादपूरमध्ये एमआयडीसी स्थापन करण्याबाबतचा निर्णय शासन कधीपर्यंत घेणार, असा थेट सवाल त्यांनी सभागृहात उपस्थित केला.


जालना जिल्ह्यातील मंठा येथील एमआयडीसी संदर्भात सदस्य राजेश राठोड यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या चर्चेत सहभागी होताना दरेकर यांनी पोलादपूरचा विषय मांडला. "पोलादपूरमध्ये एमआयडीसीसाठी आवश्यक असलेली जमीन उपलब्ध आहे, पाण्याची मुबलक सोय आहे, वाहतुकीची उत्तम साधने आणि स्थानिक मनुष्यबळही मोठ्या प्रमाणात आहे. सर्व निकष पूर्ण होत असतानाही उद्योग विभाग यावर कधी निर्णय घेणार?" असा प्रश्न दरेकर यांनी विचारला. तसेच एमआयडीसी स्थापन करण्याचे नेमके निकष काय आहेत, याची स्पष्टताही त्यांनी मागितली.


आमदार प्रवीण दरेकर यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी एमआयडीसी स्थापन करण्याबाबतचे तांत्रिक निकष स्पष्ट केले. पोलादपूरच्या औद्योगिक विकासाबाबत शासन सकारात्मक असून, या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी चालू अधिवेशन काळातच एक विशेष बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या निर्णयामुळे पोलादपूर तालुक्यातील तरुणांच्या हाताला काम मिळण्याच्या आणि स्थानिक उद्योगांना चालना मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण