Holi Safety Tips And Tricks: होळीला बाजारात खरा रंग कसा ओळखायचा?

मुंबई: केमिकल रंगांचा वाढता धोका सगळीकडेच आहे. होळीचा सण म्हणजे आनंदाची उधळण. मात्र बाजारपेठेत सध्या रासायनिक आणि बनावट रंगांची मोठी आवक झाली आहे. केमिकल युक्त हे गडद रंग दिसायला आकर्षक असले तरी ते तिथकेच घातक ही आहेत. या रंगात शिसे (Lead), पारा, क्रोमियम आणि काचेचे बारीक कण मिसळलेले असतात. हे घटक केवळ त्वचेसाठीच नव्हे, तर डोळे आणि केसांसाठीही अत्यंत घातक ठरू शकतात. त्यामुळे अशा रंगापासून दुर राहा. नाही तर रंगाचा बेरंग होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुले खरा आणि खोटा रंग कसा ओळखावा हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.



अशी करा अस्सल गुलालाची ओळख


1. वासावरून ओळखा:
नैसर्गिक किंवा सेंद्रिय गुलालचा वास अत्यंत सौम्य आणि फुलांसारखा असतो. जर गुलालातून पेट्रोल, रॉकेल किंवा तीव्र रासायनिक वास येत असेल, तर तो भेसळयुक्त समजावा.


2. पाण्यात विरघळून पहा:
थोडासा गुलाल पाण्यात टाका. जर तो पूर्णपणे विरघळला आणि तळाला काहीही उरले नाही, तर तो सुरक्षित असू शकतो. मात्र, काही कण तरंगत राहिल्यास तो वापरणे टाळा.


3. स्पर्श करून पहा:
अस्सल गुलाल हातावर चोळल्यास तो मऊ आणि बारीक लागतो. जर तो खरखरीत किंवा त्यात चमकणारे कण दिसले, तर तो काचेची पूड असलेला असू शकतो.


होळी खेळण्यापूर्वी घ्यायची काळजी
त्वचेचे संरक्षण करण्यासाठी होळी खेळण्यापूर्वी अंगाला खोबरेल किंवा मोहरीचे तेल लावावे. डोळ्यांच्या सुरक्षेसाठी कॉन्टॅक्ट लेन्स टाळून चष्मा वापरावा. तसेच, पूर्ण बाह्यांचे कपडे घातल्यास रंगाचा थेट संपर्क टाळता येतो. रंग काढताना त्वचा जोरात न घासता बेसन, दही किंवा तेलाचा वापर करावा. त्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. कारण सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात भेसळ युक्त रंग विकण्यास आले आहेत. त्यात केमिकलचा वापर ही भरमसाट करण्यात आला आहे. त्यामुळे ही काळजी घेणे गरजेचे आहे.


आरोग्यदायी होळीसाठी काही नियम नक्कीच आहे. ते प्रत्येकाने फॉलो करणे गरजेचे आहेत. होळी खेळताना पूर्ण कपडे घाला जेणेकरून शरीराचा कमीत कमी भाग उघडा राहील. केसांच्या संरक्षणासाठी तेल लावून बांधून ठेवा. रंग काढण्यासाठी त्वचा जोरात चोळू नका, त्याऐवजी बेसन आणि दह्याचे मिश्रण वापरा. पॅकेटवर घटक (Ingredients) तपासूनच खरेदी करा. नैसर्गिक रंग वापरून आपली आणि आपल्या प्रियजनांची होळी सुरक्षित आणि आनंददायी करा.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''