योग्य इतिहास शिकवला असता तर औरंगजेब एकाही मुसलमानाचा हिरो नसता! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- ७५ हजार हिंदूंची कत्तल करणाऱ्या टिपूची शिवरायांशी बरोबरी खपवून घेणार नाही


मुंबई : "देशाचा खरा इतिहास ७० वर्षे जाणीवपूर्वक लपवून ठेवण्यात आला. जर योग्य वेळी नीट आणि वस्तुनिष्ठ इतिहास शिकवला गेला असता, तर आज या देशातील एकाही मुसलमानाने क्रूरकर्मा औरंगजेबाला आपला 'हिरो' मानले नसते," अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (२६ फेब्रुवारी) विधानसभेत विरोधकांवर प्रहार केला. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी इतिहासाच्या विकृतीकरणाचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस आणि डाव्या विचारसरणीवर निशाणा साधला.


आमदार विजय वडेट्टीवार आणि भास्कर जाधव यांनी उपस्थित केलेल्या टिपू सुलतानच्या मुद्द्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, टिपू सुलतान चांगले होते की, वाईट यावर आमचा आक्षेप नाही. पण ज्यावेळी टिपू सुलतान हे छत्रपती शिवरायांऐवढे मोठे राजे होते, असे कुणीतरी म्हणतो, त्याला आमचा आक्षेप आहे. दुर्दैवाने, या देशाच्या इतिहासाशी जी छेडछाड करण्यात आली, त्यात वर्षानुवर्षे आम्हाला टिपू सुलतान हे महान राजे होते हेच शिकवण्यात आले. पण ७५ हजार हिंदूंची आणि ३३ हजार नायरांची कत्तल करणारेही टिपू सुलतानच होते, हे आम्हाला कधीच शिकवले नाही. आता खरा इतिहास सापडतो आहे.





या देशात सरकारने ७० वर्षे एनसीईआरटीच्या पुस्तकात मुघल साम्राज्याला १७ पाने दिली आणि छत्रपती शिवरायांना एक परिच्छेद दिला. आता मोदी सरकारने एनसीईआरटीमध्ये छत्रपती शिवरायांच्या मराठ्यांच्या इतिहासाला २० पाने दिली. योग्यवेळी नीट इतिहास शिकवला असता तर या देशातील एकाही मुसलमानाने औरंगजेबाला आपाला हिरो म्हटले नसते. पण आपण खरा इतिहास कधी शिकवलाच नाही. या देशात अनेक राष्ट्रभक्त मुस्लीम आहेत आणि त्यांच्याबद्दल आमचा कुठलाच आक्षेप नाही. जे लोक देशाच्या विरोधातील लोकांना आपला हिरो म्हणतील त्यांच्याविरुद्ध आम्ही लढाई करू, असा इशाराही त्यांनी दिला.

Comments
Add Comment

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने