नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा कॉलेजच्या मेस मधून. मात्र याच मेसमधील जेवण तुमच्या आरोग्यासाठी धोक्याचं ठरलं तर ?


नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या मेसच्या जेवणात चक्क अळ्या आणि वेगवेगळे छोटे किडे आढळून आले आहेत. त्याचे काही फोटो सध्या सोशल मीडियावरून व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे मेडिकल कॉलेजच्या पदवीधर विद्यार्थ्यांच्या जेवणात हे कीडे आढळून आले .



नेमका आरोप काय?


२५ फेब्रुवारी रोजी दुपारच्या जेवणादरम्यान काही विद्यार्थ्यांच्या ताटात अळी दिसल्याचा आरोप आहे. फळांच्या तुकड्यांवर मृत किडा आढळल्याचेही सांगितले जात आहे. भाजीमध्ये अळ्या तसेच मशरूमच्या पदार्थात किडे असल्याची चर्चा विद्यार्थ्यांमध्ये रंगली. विशेष म्हणजे, काहींना जेवण संपल्यानंतर हा प्रकार लक्षात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आरोग्य सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.



महाविद्यालय प्रशासनाचे स्पष्टीकरण


महाविद्यालय प्रशासनाने या आरोपांवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, त्यांच्याकडे अद्याप कोणतीही लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंची सत्यता तपासण्याची प्रक्रिया सुरू आहे. संस्थेतील प्राध्यापक, डीन आणि वरिष्ठ अधिकारीही त्याच मेसमध्ये जेवण घेतात, असेही प्रशासनाने नमूद केले. स्वच्छतेबाबत संस्थेचे धोरण कठोर असल्याचे सांगत, मेस व्यवस्थापन करणाऱ्या कंत्राटदाराकडून त्रुटी आढळल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.



विद्यार्थी परिषदेची भूमिका


विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी प्रशासनाला कळवले की, त्यांच्या पातळीवर अधिकृत तक्रार आलेली नाही. काही विद्यार्थ्यांनी मात्र मेसमधील मर्यादित जागा आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे वाढणाऱ्या गर्दीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनानेही एका काउंटरवर कर्मचारी अनुपस्थित असल्याची बाब मान्य केली असून संबंधित कंत्राटदाराला तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


सध्या संपूर्ण प्रकरणाची पडताळणी केली जात असून, आरोपांमध्ये तथ्य आहे की नाही? याचा तपास सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न असल्याने या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. अंतिम अहवालानंतरच पुढील कारवाई स्पष्ट होणार आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी