राज्यात लवकरच ‘धर्मांतरबंदी कायदा’ - गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचे संकेत; मदरशांची होणार सखोल पडताळणी

मुंबई : प्रलोभने दाखवून किंवा बळजबरीने केल्या जाणाऱ्या धर्मांतराच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी राज्य सरकार आता कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. राज्यात लवकरच ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करण्याचे संकेत गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर यांनी गुरुवारी विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना दिले.


धर्मांतराच्या तक्रारींची दखल घेत सरकार यासंदर्भातील कायद्याचा मसुदा आणि अंमलबजावणीबाबत गांभीर्याने विचार करत आहे. कोणाचेही नुकसान करण्याचा आमचा हेतू नाही, मात्र कायद्याचा धाक असणे आवश्यक आहे, असे भोयर म्हणाले. राज्यातील मदरशांमध्ये चालणाऱ्या उपक्रमांबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. मदरशांमधील कामाची आणि तिथे घडणाऱ्या प्रकारांची सखोल पडताळणी केली जाईल. त्यानंतर पुढील योग्य तो कायदेशीर निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका मदरशात दोन लहान मुलांना अमानुष मारहाण होत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाला आहे. या प्रकरणाची सत्यता पडताळण्याचे आदेश सिंधुदुर्ग पोलिसांना देण्यात आले असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.



ऑर्केस्ट्रा बारचा परवाना जप्त करणार


राज्यात ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली चालणाऱ्या अवैध धंद्यांवर सरकारने चाप बसवण्याचे ठरवले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बारचा परवाना पहिल्यांदा काही दिवसांसाठी निलंबित केला जाईल. मात्र, वारंवार नियमांची पायमल्ली होत असल्याचे आढळल्यास, संबंधित बारचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असा इशारा भोयर यांनी दिला.



मंत्रालय हे अन्यायाचे केंद्र नाही


मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्रालयाबाबत केलेल्या विधानांचाही पंकज भोयर यांनी समाचार घेतला. "मंत्रालय हे कोणाच्या विरोधात कट रचण्याचे ठिकाण नसून सर्वसामान्यांना न्याय देणारे केंद्र आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी मंत्रालयाविषयी चुकीची विधाने करणे टाळावे," असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

Comments
Add Comment

Jaykumar Rawal : अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत मुंबई विमानतळाजवळ ‘नंदगिरी राज्य अतिथीगृह’ उभारणार; मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई : विविध राज्यांतून मुंबईत येणाऱ्या मान्यवर अतिथींच्या निवासासोबतच ट्रान्झिट प्रवासादरम्यान

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

ITR Filing 2026 : देशात आयटीआर भरणाऱ्यांचा विक्रमी आकडा; ७.८ कोटींचा टप्पा पार

नवी दिल्ली : देशात आयकर रिटर्न (आयटीआर) दाखल करणाऱ्यांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. मूल्यांकन वर्ष

Chandrashekhar Bawankule : अर्थसंकल्पातील मंजूर निधी ओबीसी मंत्रालयाला द्या; ओबीसी मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी

ओबीसी महामंडळांचे प्रश्न डिसेंबरपर्यंत मार्गी परदेशी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी संख्या वाढविणार बैठकीत १३

Russia Ukraine War : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीयासह १२ जणांचा मृत्यू

कीव्ह : रशियाने युक्रेनवर रात्रभर केलेल्या भीषण हवाई हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा आणि इतर ११ जणांचा अशा एकूण १२