Bigg Boss Marathi 6: अनुश्रीचा प्लॅन फसला; बिग बॉसमधील कपल पुन्हा एकत्र

मुंबई : ' बिग बॉस मराठी ६ 'च्या २६ फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये बिग बॉस कॅप्टन्सी टास्क घेतात. पहिल्या फेरीत विशाल तन्वी, दीपाली यांना कॅप्टन्सीच्या फेरीतून बाद करतो. दीपाली विशालला सुनावते. अनुश्री टोळीचे प्लॅन काटा ग्रुपला सांगते. दुसऱ्या फेरीत विशाल आणि राकेशमध्ये बाचाबाची होते. रुचिता दुसऱ्या फेरीत रुचिता बझर दाबते. अनुश्री विशालच्या विरोधात रुचिताचे कान भरते. दुसऱ्या फेरीत रुचिता, राकेश आणि रोशनला कॅप्टन्सीच्या रेसमधून बाद करते. दीपाली उगाच लाग लावण्याचा प्रयत्न करते. अनुश्रीला विशालला कॅप्टन्सीच्या रेसमधून काढायचं असतं.


रुचिता म्हणते, 'विशाल आणि माझ्यामधून कोणाला काढायचं असेल तर मला काढा' त्यावर विशाल रुचिताला म्हणतो, 'मला माहितीये मी बाहेर गेलो तर जनतेच्या व्होटने जाईन, हे लोक मला नाही बाहेर काढू शकत' विशाल रुचिताला समजावतो. तिसऱ्या फेरीत रोशन बझर दाबतो. रोशन प्राजक्ता आणि विशालला कॅप्टन्सीच्या फेरीतून बाद करतो. अनुश्री, विशालच्या चुगलीबद्दल बोलते. अनुश्री, टोळी सोडते. विशाल आणि अनुश्रीमध्ये शाब्दिक चकमक होते. शेवटी, रुचिता कॅप्टन पदाची तिसरी उमेदवार होते. प्रभू, रुचिता आणि अनुश्री या तिघांमध्ये कॅप्टन्सी टास्क होणार, असं बिग बॉस सांगतात.


अनुश्रीने सोडली टोळी
अनुश्री सगळीकडे आग लावून मोठमोठ्याने आरडाओरडा करते. दीपाली आणि तन्वी अनुश्रीला समजावतात. रुचिता विशालला म्हणते, 'मला तुझ्याविरुद्ध नाही बोलायचं, मला तुझ्यासोबत राहायचंय. तुझ्याशिवाय न राहणं मला खटकलंय' रुचिता आणि विशालमध्ये सगळं नॉर्मल होतं. अनुश्री, टोळीतून बाहेर पडल्यामुळे दीपालीला खूप आनंद होतो. तन्वीला अनुश्रीवर संशय येतो.



रुचिता, प्रभू आणि अनुश्रीमध्ये कॅप्टन्सी टास्क


दुसऱ्यादिवशी सकाळी अनुश्री, सागर आणि प्राजक्ताला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते. तन्वी आणि राखीमध्ये शाब्दिक चकमक होते. राखी मुद्दाम राकेश आणि प्राजक्ताचं नाव एकमेकांसोबत जोडते. बिग बॉस अनुश्री, रुचिता आणि प्रभू यांच्यात कॅप्टन्सी टास्क घेतात.सदस्यांना जोड्यांमध्ये रील्स तयार करून कॅप्टन्सीचे दावेदार असलेल्या सदस्यांसोबत कॉलाबोरेट करायचे असतात. ज्यांचे रील्स जास्त व्हायरल होतील आणि ज्यांचे कॉलाबोरेशन्स जास्त असतील, तो सदस्य कॅप्टन होईल, असं बिग बॉस सांगतात. त्यामुळे आत उद्याच्या भागात कॅप्टन कोण होणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’