'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच चंद्रग्रहण दिसणार आहेत. भारतातून संध्याकाळी चंद्र उगवताच अरुणाचल प्रदेशातून खग्रास, तर महाराष्ट्रातून खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार असल्याची माहिती ज्येष्ठ खगोल अभ्यासक आणि 'स्काय वॉच ग्रुप'चे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली आहे.


खरं तर भारतातून चंद्र अदृष्य असताना दुपारी ३.२० वाजता खंडग्रास ग्रहणाला सुरूवात होईल, तर ४.३४ वाजता खग्रास चंद्रग्रहण दिसेल आणि ५.३२ मिनिटांनी खग्रास ग्रहण संपेल. भारतातून केवळ अरुणाचल प्रदेशातून खग्रास चंद्रग्रहण दिसेल. कोलकाता येथून ९० टक्के, टक्के, गडचिरोली येथून ३० टक्के, चंद्रपूर, नागपूर येथून चंद्र उगवताना २५ टक्के ,पुणे येथे १० टक्के, तर मुंबई येथे उंचीवर केवळ १ टक्के खंडग्रास ग्रहण दिसेल. विदर्भात संध्याकाळी ६.१८ ते ७.३३ वाजता अल्प ग्रहण दिसेल.


हे ग्रहण पाकिस्तान,अफगाणिस्तान पासून भारतासहीत पुर्वेकडील देश ऑस्ट्रेलिया, आशिया, अमेरिका येथे दिसेल. ह्यापूर्वी जगातील काही स्थळी १७ फेब्रुवारीला कंकणाकृती सूर्यग्रहण दिसले होते तसेच पुढे १२ ऑगस्ट रोजी खग्रास सूर्यग्रहण तर २८ ऑगस्ट रोजी खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे.


महाराष्ट्रातून केवळ १ तास ३५ मिनिटेच अल्प ग्रहण दिसेल.आणि हे ग्रहण पूर्व क्षितिजावर असल्याने फारसे सुंदर दिसणार नाही. घरावरून किंवा टेकडीवरून हे ग्रहण थोडे चांगले दिसेल. ग्रहण दुर्बिणीने फारसे चांगले दिसत नसल्याने साध्या डोळ्याने ते पाहिले पाहिजे. ग्रहणे ही वैज्ञानिक घटना असल्यामुळे त्यांचा वैज्ञानिकदृष्ट्या निरीक्षण आणि अभ्यास केला पाहिजे असे प्रा. सुरेश चोपणे ह्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Mumbai Trees Damaged by Cables : टेलिकॉम कंपन्यांच्या केबल्सचा झाडांना विळखा

तातडीने उपाययोजना राबवून कारवाई करण्याची वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मागणी मुंबई : मुंबईत सध्या इंटरनेट,

Devendra Fadnavis : सुट्या खाद्य तेलाच्या विक्रीस वर्षभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

पारंपरिक व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Ashish Shelar : दहिसर 'ट्रान्सपोर्ट हब'च्या कामादरम्यान 'ब्लास्टिंग' नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा!

- पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी मुंबई : दहिसर

Devendra Fadnavis : मंत्री नितेश राणे, संग्राम जगताप, महेश लांडगे हे हिंदू नायक, त्यांनी पुढेही हिंदुत्वासाठीच काम केले पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार संग्राम जगताप आणि महेश लांडगे हे तिघेही हिंदू नायक असून

AndheriNews : वीरा देसाई रोड, जे.पी, रोड, आझाद नगरमधील आता तुंबणार पाण्यातून होणार सुटका

मोगरा नाल्यातील प्रवाह आता वळवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोड, जे.पी.रोड आणि आझाद

BMC : मोठ्या मंडळांसाठी समन्वय अधिकारी नेमा; समन्वय समितीची महापालिकेकडे मागणी!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत मोठ्याप्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात, अशा मंडळांसाठी महापालिकेने समन्वय