टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंगच्या वडिलांचं निधन

मुंबई: टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंग याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रिंकु सिंग गेल्या दोन दिवसांपासून वडील वेन्टिलेटरवर असल्याने घरी गेला होता. मात्र, झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यासाठी तो देशसेवेवर परत आला. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी तर मिळाली नाही. पण तो फिल्डिंगसाठी उतरला होता. अशातच आता त्याच्या वडिलांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी ग्रेटर नोएडा येथील यथार्थ रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.


रिंकू सिंगचे वडील खाचंद्र सिंग हे स्टेज 4 लिव्हर कॅन्सरशी झुंजत देत होते. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावरी होती. त्यानंतर त्यांना मेकॅनिकल व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. त्यांना सतत रेनल रिप्लेसमेंट थेरपी दिली जात होती. मात्र, अखेर त्यांना जास्त वेळ झुंज देता आली नाही. अशातच रिंकु सिंग आता घरी परत गेला असून अंत्यविधी झाल्यानंतर तो संघात सामील होईल.


भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामन्यात रिंकु सिंग वडिलांना सोडून पुन्हा टीम इंडियासाठी परत आला होता. मॅच झाल्यानंतर तो पुन्हा हॉस्पिटलला गेला मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. रिंकु सिंगला टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती. पण तो फिल्डिंगला मैदानात उतरला. त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं. त्यावेळी त्याने एक चूक देखील केली होती. त्याच्या हातातून एक कॅच देखील निसटला होता. मात्र, कॅप्टन सूर्या त्याला एका शब्दाने काहीही बोलला नाही.


दरम्यान, रिंकू सिंग हा उत्तर प्रदेशातील अलिगडचा रहिवासी आहे. आयपीएलमध्ये यश दयालला एकाच ओव्हरमध्ये पाच सिक्स मारल्यानंतर तो प्रकाशझोतात आला होता. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. रिंकुने थेट टीम इंडियाची जर्सी घातली अन् भारताला देखील मोठमोठे सामने जिंकून दिले.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून