Big Boss Marathi Season 6 : बिग बॉस मराठी ६ मध्ये आयुषच्या विषयावरून तन्वीची खरडपट्टी; प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : बिग बॉस मराठी ६ मध्ये सातव्या आठवड्यात ड्रामा, आरोप-प्रत्यारोप आणि भावनिक उद्रेक यांचा जोर वाढला आहे. घरातील स्पर्धकांमधील समीकरणे बदलत असताना आयुषच्या नावावरून पुन्हा एकदा वातावरण तापले आहे.


अभिनेता आयुष संजीव आणि तन्वी यांच्यात घरात चांगली मैत्री होती. मात्र इतर सदस्यांनी त्यांच्या नात्याबद्दल वेगवेगळे अंदाज लावण्यास सुरुवात केली. अलीकडील भागात राखी सावंत हिने मुद्दाम आयुषचा विषय काढत तन्वीला चिमटा काढला. यानंतर तन्वीने तीव्र प्रतिक्रिया दिली आणि घरात मोठा गोंधळ झाला.


या सर्व प्रकारावर ‘भाऊच्या वर रितेश देशमुख यांनी तन्वीला थेट प्रश्न विचारले. छोट्या गोष्टीला अनावश्यकपणे मोठं रूप देत असल्याची टिप्पणी करत त्यांनी तिच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली. आवाज चढवून प्रतिक्रिया देण्याबाबत त्यांनी स्पष्ट शब्दांत सुनावले.





दरम्यान, या भागाचा प्रोमो सोशल मीडियावर झळकताच प्रेक्षकांकडून विविध प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी तन्वी अतिप्रतिक्रिया देत असल्याचं म्हटलं, तर काहींनी तिच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आयुष घरात असताना आणि त्यानंतर तिच्या वागण्यात फरक जाणवल्याची चर्चा देखील नेटकर्‍यांमध्ये रंगली.


आता पुढील भागात या वादाची दिशा काय असेल आणि घरातील समीकरणे कशी बदलतील, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’