क्रिकेटच्या 'थाला'ला हाऊसिंग बोर्डाची नोटीस; केवळ १५ दिवसांची मुदत

क्रिकेटचा थाला अशी ओळख असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला झारखंड राज्य गृहनिर्माण मंडळाने नोटीस बजावली आहे. ही नोटीस रांची येथील त्याच्या निवासी भूखंडाच्या व्यावसायिक वापराबद्दल असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या नोटीसनुसार, धोनीला निवासी उद्देशांसाठी वाटप केलेल्या मालमत्तेतून पॅथॉलॉजी लॅब चालवली जात असल्याचा आरोप आहे.



नेमकं प्रकरण काय ?


झारखंड स्टेट हाऊसिंग बोर्डाने धोनीला एक अधिकृत नोटीस बजावली असून, ही नोटीस रांचीमधील हरमू परिसरातील एका निवासी प्लॉटशी संबंधित आहे. H-10A क्रमांकाच्या या प्लॉटबाबत बोर्डाने गंभीर आक्षेप नोंदवले असून, नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा केला आहे. हाऊसिंग बोर्डाच्या आरोपांनुसार, संबंधित प्लॉट केवळ राहण्याच्या उद्देशाने देण्यात आला होता.



धोनीने पॅथॉलॉजी लॅब चालवली?


मात्र, सध्या त्या ठिकाणी कथितरीत्या एक पॅथॉलॉजी लॅब चालवली जात असल्याची माहिती समोर आली आहे. निवासी क्षेत्रात व्यावसायिक उपक्रम राबवणे हे वाटप नियमांच्या अटींचे थेट उल्लंघन असल्याचे बोर्डाचे म्हणणे आहे. या प्रकरणी धोनीकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले असून प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.



नियमांचे उल्लंघन कोणासाठीही खपवून घेतले जाणार नाही :


बोर्डाने आपल्या नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे की, जर १५ दिवसांच्या आत धोनीकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही, तर या प्लॉटचे वाटप रद्द करण्याची शिफारस केली जाऊ शकते. हाऊसिंग बोर्ड सध्या अशा सर्व प्रकरणांची चौकशी करत आहे, जिथे निवासी जागांचा वापर कमर्शियल कामांसाठी केला जात आहे. नियमांचे उल्लंघन कोणासाठीही खपवून घेतले जाणार नाही, असा थेट इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून