NCMC Smart Card : एसटीच्या 'NCMC स्मार्ट कार्ड'ला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; आठवड्याभरातच १ लाखाचा टप्पा पार!

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या ‘NCMC स्मार्ट कार्ड’ (National Common Mobility Card) उपक्रमाला राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने टाकलेल्या या पावलाला अवघ्या आठवड्याभरातच १ लाखाहून अधिक प्रवाशांनी पसंती दर्शवली आहे. या यशाबद्दल परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी समाधान व्यक्त केले असून, ही आकडेवारी एसटीच्या आधुनिक प्रवासाची साक्ष असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सात दिवसांत एकूण १,००,०२१ प्रवाशांनी या स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. यामध्ये ‘महिला सन्मान योजने’च्या लाभार्थ्यांचा वाटा सर्वाधिक असून, तब्बल ३७,९२७ महिलांनी नोंदणी केली आहे. त्याखालोखाल ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेतील ३४,९४८ नागरिक आणि इतर ज्येष्ठ नागरिकांपैकी २४,९२७ जणांनी डिजिटल प्रवासाला पसंती दिली आहे. तसेच, इतर सर्वसाधारण प्रवाशांनीही या उपक्रमात आपला सहभाग नोंदवला आहे. पारंपारिक रोख व्यवहारांना फाटा देऊन सुरक्षित आणि पारदर्शक प्रवास करण्याकडे प्रवाशांचा कल वाढत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.



सक्तीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका


दरम्यान, १ मार्चपासून स्मार्ट कार्डशिवाय सवलत मिळणार नाही, अशा चर्चा समाज माध्यमांवर पसरल्या होत्या. यावर स्पष्टीकरण देताना महामंडळाने सांगितले की, जोपर्यंत किमान ८०% सवलत धारक प्रवाशांची नोंदणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे कार्ड अनिवार्य केले जाणार नाही. त्यामुळे प्रवाशांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. तरीही, भविष्यातील सुलभ प्रवासासाठी जवळच्या बसस्थानकावर किंवा अधिकृत एजंटकडे जाऊन आपली नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. हे 'वन नेशन वन कार्ड' तत्त्वावर आधारित कार्ड भविष्यात इतर सार्वजनिक वाहतूक सेवांसाठीही वापरता येणार आहे, ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक 'स्मार्ट' होणार आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी