अमेरिकेचा तेहरानवर हवाई हल्ला; सर्व उड्डाणे तात्काळ रद्द

तेहरान : मध्य पूर्वेत अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असताना इराणची राजधानी तेहरान येथे हवाई हल्ले झाल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहे. व्हायरल होणारे व्हिडिओ आणि स्थानिक माध्यमांच्या अहवालानुसार शहरातील काही भागांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले आणि मध्यवर्ती परिसरात धुराचे लोट दिसून आले.


ही कारवाई इस्त्रायल कडून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. अमेरिकेसोबत वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा घटनाक्रम घडल्याचे सांगितले जात आहे. काही क्षेपणास्त्रे विद्यापीठ परिसरासह इतर भागांमध्ये पडल्याची प्राथमिक माहिती आहे. अधिकृत पातळीवर संपूर्ण तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही.



इस्रायलमध्ये आणीबाणीचा इशारा


संभाव्य प्रत्युत्तराच्या धोक्यामुळे इस्रायलमध्ये खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. इस्रायली संरक्षण दलाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे, स्वतःचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे. परिस्थिती तणावपूर्ण असल्याने तेल अवीव येथील सर्व व्यावसायिक उड्डाणे तात्पुरती रद्द करण्यात आली आहेत.



हवाई क्षेत्र तात्पुरते बंद


इस्रायलच्या वाहतूक मंत्रालयाकडून सुरक्षेच्या कारणास्तव नागरी विमानसेवा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. सुरक्षा स्थितीचा आढावा घेतल्यानंतरच हवाई क्षेत्र पुन्हा खुले करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. उड्डाणे सुरू करण्यापूर्वी किमान २४ तास आधी सूचना दिली जाईल, असेही सांगण्यात आले.


दरम्यान, अमेरिकेतील परदेशी दूतावासांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी राहण्याचे निर्देश दिले आहेत. परिस्थितीचा वेगाने बदलणारा स्वरूप लक्षात घेता आंतरराष्ट्रीय पातळीवरही या घडामोडींवर बारकाईने नजर ठेवली जात आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे