नागपूरच्या गनपावडर कारखान्यात स्फोट, १७ ठार

नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमधून होलिकोत्सवाच्या आदल्या दिवशी एक दुःखद बातमी आली आहे. नागपूर जिल्ह्यातील एसबीएल एनर्जी एक्सप्लोजिव्हज या गनपावडर तयार करणाऱ्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आणि १८ जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले.


नागपूर दुर्घटनेप्रकरणी नियमानुसार पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी मधून प्रत्येक मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये सानुग्रह मदत तसेच जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून केली आहे. तसेच नागपूर जिल्ह्यातील दुर्घटनेप्रकरणी नियमानुसार मृतांच्या वारसांना पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करून केली आहे. कंपनीकडूनही मृतांच्या वारसांना आणि जखमींना मदत दिली जाणार आहे.


नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे एसबीएल एनर्जी एक्सप्लोजिव्हज या गनपावडर तयार करणाऱ्या कारखान्यात स्फोट झाला. खाणकाम आणि औद्योगिक स्फोटके बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट झाला. घटना सकाळी सात ते सव्वासातच्या दरम्यान घडली. खाणकामासाठी तसेच विविध औद्योगिक कामासाठी कारखान्यात गनपावडरची निर्मिती सुरू होती. हे काम सुरू असताना दुर्घटना झाली. माहिती मिळताच जिल्हाधिकारी विपिन इटनकर आणि एसपी पोदार घटनास्थळी पोहोचले, त्यांनी मदतकार्याचा आढावा घेतला.

Comments
Add Comment

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम