मध्य रेल्वेच्या १८ होळी विशेष गाड्यांची घोषणा

मुंबई : होळी सणाच्या निमित्ताने होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मडगांव/हटिया, लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगांव आणि पुणे - दानापूर दरम्यान १८ अतिरिक्त विशेष सेवा चालवणार आहे.


(१) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मडगांव - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वातानुकूलित विशेष - (४ सेवा)


ट्रेन क्रमांक ०१०४९ विशेष दिनांक ०३.०३.२०२६ आणि ०६.०३.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.३० वाजता सुटेल आणि मडगांव येथे त्याच दिवशी दुपारी १३.३० वाजता पोहोचेल. (२ सेवा)


ट्रेन क्रमांक ०१०५० विशेष दिनांक ०३.०३.२०२६ आणि ०६.०३.२०२६ रोजी मडगांव येथून १६.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०५.२० वाजता पोहोचेल. (२ सेवा)


थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी.


संरचना: १८ वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी आणि २ जनरेटर व्हॅन.


(२) लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगांव – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष - (४ सेवा)


ट्रेन क्रमांक ०१०४७ दिनांक २८.०२.२०२६ आणि ०७.०३.२०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २२.१५ वाजता सुटेल आणि मडगांव येथे दुसऱ्या दिवशी १२.०० वाजता पोहोचेल. (२ सेवा)


ट्रेन क्रमांक ०१०४८ दिनांक ०१.०३.२०२६ आणि ०८.०३.२०२६ रोजी १८.०० वाजता मडगाव येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०६.५० वाजता पोहोचेल. (२ सेवा)


थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगांव रोड (फक्त 01047 साठी), कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी.


संरचना: १ वातानुकूलित द्वितीय, ६ वातानुकूलित तृतीय, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय, १ सामान्य द्वितीयसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.


(३) लोकमान्य टिळक टर्मिनस - हटिया - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष- (४ सेवा)


ट्रेन क्रमांक ०८६१० विशेष दिनांक ०४.०३.२०२६ आणि ११.०३.२०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ५.०० वाजता सुटेल आणि हटिया येथे दुसऱ्या दिवशी १८.०० वाजता पोहोचेल. (२ सेवा)


ट्रेन क्रमांक ०८६०९ विशेष दिनांक ०२.०३.२०२६ आणि ०९.०३.२०२६ रोजी हटिया येथून १६.२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी ००.४० वाजता पोहोचेल. (२ सेवा)


थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा आणि राउरकेला.


संरचना: २ वातानुकूलित द्वितीय, ५ वातानुकूलित तृतीय, २ वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी, ७ शयनयान, ४ सामान्य द्वितीय, १ सामान्य द्वितीयसह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.


(४) पुणे - दानापूर - पुणे विशेष (६ सेवा)


ट्रेन क्रमांक ०१४७९ विशेष दिनांक ०१.०३.२०२६, ०५.०३.२०२६ व ०९.०३.२०२६ रोजी पुणे येथून १९:५५ वाजता सुटेल आणि दानापूर येथे तिसऱ्या दिवशी ०८:०० वाजता पोहोचेल. (३ सेवा)


ट्रेन क्रमांक ०१४८० विशेष दिनांक ०३.०३.२०२६, ०७.०३.२०२६ आणि ११.०३.२०२६ रोजी दानापूर येथून १०:०० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी १८:१५ वाजता पोहोचेल. (३ सेवा)


थांबे: दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगांव, मनमाड, जळगांव, भुसावळ, इटारसी, मदन महल, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.


संरचना: १ वातानुकूलित प्रथम, १ वातानुकूलित द्वितीय, १ वातानुकूलित तृतीय, ११ शयनयान, ५ सामान्य द्वितीय आणि २ सामान्य द्वितीयसह गार्ड ब्रेक व्हॅन.


आरक्षण:
ट्रेन क्रमांक ०१०४७, ०१०४९ आणि ०१४७९ या विशेष गाड्यांसाठी बुकिंग सुरू आहे आणि
ट्रेन क्रमांक ०८६१० या विशेष गाडीसाठी बुकिंग दि. ०२.०३.२०२६ रोजी
सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि http://www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू होईल.


सामान्य शुल्कासह अनारक्षित डब्यांचे बुकिंग UTS प्रणालीद्वारे करता येईल.
प्रवाशांनी तिकिटांचे बुकिंग करण्यासाठी RailOne ॲप डाउनलोड करावे.
या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करावे.

Comments
Add Comment

Virar News: विरारमध्ये ज्युनिअर आर्टिस्टची आत्महत्या, अश्लील व्हिडिओंच्या आधारे कोट्यवधींची खंडणी उकळल्याचा आरोप

विरार: अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी उकळल्याच्या प्रकाराला कंटाळून

Versova Beach Dead Body : वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गोणीत सापडला मृतदेह; 6 आरोपींना अटक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 1 ऑक्टोबर रोजी गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके