नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

मुंबई: नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. व्यंकट बापुराव धुमाळे, शेळगाव येथील काँग्रेसचे विधी उपाध्यक्ष ॲड अशोक गंगाराम कापसे, काँग्रेसच्या डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. मिलिंद शिकारे यांच्यासह त्यांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या प्रवेशामुळे नांदेड जिल्ह्यात तळागाळात शिवसेना पोहोचल्याची भावना शिंदे यांनी व्यक्त केली.


यावेळी त्यांच्यासह मरखेलचे प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष दीपक रेड्डी, व्यंकट पाटील, धनाजी पाटील, गंगाधर लोणे, सरपंच आनंद राजुरे, पवन भुताळे, विठ्ठल सुनसर, गजानन पाटील, विजय पाटील, शिवराज पाटील, अर्जुन गायकवाड, सुरेश मुंडकर, गौतम वाघमारे असे सात सरपंच तर बळीराम बेगडे आणि पांडुरंग वाघमारे हे माजी सरपंच तसेच असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


यावेळी बोलताना शिंदे यांनी गेल्या साडेतीन वर्षात राज्यातील महायुतीच्या वतीने नांदेड जिल्ह्यात अनेक विकासकामे करण्यात आली. त्यामुळंच तळागाळातील लोकांना शिवसेना ही आपली वाटू लागली आहे. त्यामुळेच पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून चांदा ते बांदा शिवसेनेचा विस्तार होत असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. तसेच नांदेड जिल्ह्यात शिवसेनेचा विस्तार चांगल्या पद्धतीने होत असून दिवसेंदिवस पक्ष अधिक मजबूत होत असल्याचे सांगितले. तसेच आज पक्षप्रवेश केलेल्या सर्वांनी पक्ष अधिक मजबुत करण्यासाठी कामाला लागावे अशी अपेक्षा व्यक्त केली.


यावेळी बालाजी पाटील खतगावकर, भद्रावती वरोरा जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे आणि शिवसेनेचे नांदेड जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.

Comments
Add Comment

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.