CSK New Jersey : चेन्नई सुपर किंग्जच्या नव्या जर्सीचे अनावरण

पाच वेळा विजेत्या चेन्नई सुपर किंग्जने म्हणजेच सीएसकेने आयपीएल २०२६ च्या आधी त्यांची नवीन जर्सीचे अनावरण केले आहे. चेन्नईने शनिवारी (२८ फेब्रुवारी) सोशल मीडियावर एका पोस्ट करून खळबळ उडवून दिली होती. ज्यामध्ये रविवारी सकाळी ७:०७ वाजता भारतीय वेळेनुसार मोठी घोषणा करण्यात येणार असल्याचे नमूद केले होते.


त्यानुसार सीएसकेने नंतर एक व्हिडिओ रिलीज करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. या व्हिडिओमधून चेन्नईच्या टीमने आयपीएलच्या नवीन हंगामापूर्वी सीएसके कॅम्पमध्ये धोनीचे आगमन झाल्याची माहिती दिली आणि आयपीएल २०२६ जर्सीची पहिली झलक देखील दाखवली. त्यामुळे चाहत्यांच्या आनंदात वाढ झाली.





कशी आहे चेन्नईची नवीन जर्सी ?


२०२६ च्या जर्सीमध्ये सीएसकेची सिग्नेचर स्टाइल कायम आहे तर सूक्ष्म डिझाइन अपडेट्स देखील आहेत. स्लीव्हजवर पूर्वी दिसणारा कॅमफ्लाज पॅटर्न आता समोरील बाजूस ठळक पट्टे म्हणून पुन्हा वापरण्यात आला आहे, ज्यामुळे किटला एक ताजा आणि विशिष्ट लूक मिळाला आहे. सीएसकेच्या क्रेस्टवर पाच स्टार आहेत, जे फ्रँचायझीच्या पाच इंडियन प्रीमियर लीग विजेतेपदांचे प्रतिनिधित्व करतात (२०१०, २०११, २०१८, २०२१ आणि २०२३).


दरम्यान, सीएसकेची गेल्या हंगामात कामगिरी खराब होती. १४ सामन्यांपैकी सीएसके १० सामन्यात पराभूत झाले आणि आयपीएल २०२५ च्या गुणतालिकेत तळाशी राहिले. २०२६ च्या हंगामापूर्वी, सीएसकेने आगामी हंगामासाठी त्यांच्या संघात काही मोठे बदल केले. त्यापैकी सर्वात लक्षणीय म्हणजे अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांच्याऐवजी यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसनची निवड करणे हे होते.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून