पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची खात्री आज पटली,” अशा शब्दांत इंदिरा युनिव्हर्सिटीच्या अध्यक्ष तरीता शंकर यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले.
युद्धजन्य परिस्थितीत दुबई येथे अडकलेल्या पुणे विद्यापीठाच्या ८४ विद्यार्थ्यांना विशेष विमानाने सुरक्षित मायदेशी परत आणल्याबद्दल त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले.


अमेरिका–इस्त्रायल आणि इराण यांच्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे मध्यपूर्वेतील वातावरण अचानक अस्थिर झाले. त्याच काळात पुण्यातील इंदिरा युनिव्हर्सिटीचे ८४ विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी दुबई येथे गेले होते. युद्धाचा भडका उडाल्यानंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणांबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने हे सर्व विद्यार्थी तिथेच अडकून पडले.


ही बाब समजताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ याची दखल घेत प्रशासनाशी समन्वय साधला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आणि सर्व ८४ विद्यार्थ्यांना काल रात्री सुखरूप भारतात परत आणण्यात आले.


विद्यार्थी मायदेशी परतल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला. इंदिरा युनिव्हर्सिटीच्या अध्यक्ष तरिता शंकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत केलेल्या तत्पर मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.


संकटाच्या वेळी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील आणि तत्पर नेतृत्वाचे पुन्हा एकदा दर्शन घडल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Comments
Add Comment

AndheriNews : वीरा देसाई रोड, जे.पी, रोड, आझाद नगरमधील आता तुंबणार पाण्यातून होणार सुटका

मोगरा नाल्यातील प्रवाह आता वळवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोड, जे.पी.रोड आणि आझाद

BMC : मोठ्या मंडळांसाठी समन्वय अधिकारी नेमा; समन्वय समितीची महापालिकेकडे मागणी!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत मोठ्याप्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात, अशा मंडळांसाठी महापालिकेने समन्वय

Malad Accident : "तिला मला शेवटचं पाहायचं आहे..."; जखमी पतीने व्हीलचेअरवरून घेतले पत्नीचे अखेरचे दर्शन

मुंबई : मालाडमध्ये रविवारी रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघाताने एका कुटुंबावर मोठा आघात केला. या अपघातात ३४

Western Railway New Timetable : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून पश्चिम रेल्वेचे नवे वेळापत्रक लागू; जाणून घ्या नवीन बदल

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा अविभाज्य भाग असलेल्या पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवांमध्ये १ सप्टेंबर

Kalwa Hospital News : कळवा रुग्णालयातील रुग्णाच्या जेवणात झुरळ? संतापाची लाट; कंत्राटदारावर कारवाईची मागणी

ठाणे : ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णाला देण्यात आलेल्या जेवणात झुरळ आढळल्याचा

Chemical Leak : चेंबूरमध्ये टँकरमधून बेन्झीनची गळती; म्हैसूर कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : चेंबूरच्या म्हैसूर कॉलनी परिसरात उभ्या असलेल्या टँकरमधून बेन्झीन केमिकलची गळती झाल्याने खळबळ उडाली.