Malad Accident : "तिला मला शेवटचं पाहायचं आहे..."; जखमी पतीने व्हीलचेअरवरून घेतले पत्नीचे अखेरचे दर्शन

मुंबई : मालाडमध्ये रविवारी रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघाताने एका कुटुंबावर मोठा आघात केला. या अपघातात ३४ वर्षीय वकील प्रियांका सत्रा यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती मयांक सत्रा गंभीर जखमी झाले. पत्नीवर अंत्यसंस्कार होण्यापूर्वी तिचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी मयांक स्वतः गंभीर जखमी असतानाही व्हीलचेअरवरून स्मशानभूमीत पोहोचले. पत्नीला पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी शेवटचा निरोप दिला. हे दृश्य पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. (Malad Accident)


प्रियांका आणि मयांक हे दोघे रविवारी रात्री दुचाकीवरून प्रवास करत होते. त्याचवेळी कृष्णा चमणकर (वय ७०) यांच्या कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कारने त्यांच्या दुचाकीसह इतर वाहनांना धडक दिली. धडक इतकी भीषण होती की प्रियांका आणि मयांक दोघेही दुचाकीवरून लांब फेकले गेले.



प्रियांकाला शेवटचा निरोप देण्यासाठी मयांक स्मशानभूमीत :


अपघातात गंभीर जखमी झालेल्या मयांक यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, पत्नी प्रियांकावर अंत्यसंस्कार होण्यापूर्वी तिचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी ते व्हीलचेअरवरून स्मशानभूमीत आले. पाणावलेल्या डोळ्यांनी पत्नीचे अंतिम दर्शन घेताना मयांक यांना पाहून उपस्थित भावूक झाले. आयुष्यभराची साथ देणाऱ्या पत्नीला अशा अवस्थेत निरोप देण्याची वेळ त्यांच्यावर आली. या हृदयद्रावक प्रसंगाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. प्रियांका यांच्या पश्चात आठ वर्षांची मुलगी आणि चार वर्षांचा मुलगा आहे. आईच्या अचानक झालेल्या मृत्यूने दोन्ही चिमुकल्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Malad Accident)



मालाडमध्ये नेमकं काय घडलं?


मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एस. व्ही. रोड आणि मामलेदार वाडी रोड जंक्शनवर रविवारी (३० ऑगस्ट) रात्री सुमारे ८ वाजता हा भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा चमणकर हे एमजी विन्सर कार घेऊन जात होते. त्यावेळी अचानक कारवरील त्यांचा ताबा सुटला. भरधाव कारने तीन रिक्षा आणि एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात रिक्षा आणि दुचाकीवरील मिळून सहा जण जखमी झाले. या अपघातात प्रियांका सत्रा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर मयांक यांच्यासह इतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Malad Accident)



चालकावर गुन्हा; न्यायालयीन कारवाई :


अपघातानंतर पोलिसांनी कृष्णा चमणकर यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात बेदरकारपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी त्यांना बोरीवली महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. पुढे त्यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला आणि उपलब्ध माहितीनुसार, त्यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला.


मालाडमधील या दुर्घटनेने एका कुटुंबाचा आधार हिरावला असून, प्रियांका यांच्या अंत्यदर्शनासाठी जखमी अवस्थेत व्हीलचेअरवरून आलेल्या मयांक यांचे दृश्य मन हेलावून टाकणारे ठरले. (Malad Accident)

Comments
Add Comment

AndheriNews : वीरा देसाई रोड, जे.पी, रोड, आझाद नगरमधील आता तुंबणार पाण्यातून होणार सुटका

मोगरा नाल्यातील प्रवाह आता वळवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोड, जे.पी.रोड आणि आझाद

BMC : मोठ्या मंडळांसाठी समन्वय अधिकारी नेमा; समन्वय समितीची महापालिकेकडे मागणी!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत मोठ्याप्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात, अशा मंडळांसाठी महापालिकेने समन्वय

Western Railway New Timetable : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून पश्चिम रेल्वेचे नवे वेळापत्रक लागू; जाणून घ्या नवीन बदल

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा अविभाज्य भाग असलेल्या पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवांमध्ये १ सप्टेंबर

Kalwa Hospital News : कळवा रुग्णालयातील रुग्णाच्या जेवणात झुरळ? संतापाची लाट; कंत्राटदारावर कारवाईची मागणी

ठाणे : ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णाला देण्यात आलेल्या जेवणात झुरळ आढळल्याचा

Chemical Leak : चेंबूरमध्ये टँकरमधून बेन्झीनची गळती; म्हैसूर कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : चेंबूरच्या म्हैसूर कॉलनी परिसरात उभ्या असलेल्या टँकरमधून बेन्झीन केमिकलची गळती झाल्याने खळबळ उडाली.

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १