Donald Trump : एकीकडे युद्ध तर दुसरीकडे ट्रम्प प्रशासनात मतभेद ?

- ब्रिटन आणि स्पेनवर बहिष्कार टाकण्यावरून ट्रम्प प्रशासनात अंतर्गत मतभेत ?


इराणवरील हल्ल्यांसाठी लष्करी तळ वापरू न दिल्याबद्दल ट्रम्प यांनी स्पेन आणि ब्रिटनवर जोरदार टीका केली आहे. गेल्या पाच दिवसांपासून अमेरिका इराणवर हल्ले करत आहे. अमेरिका इराण यांच्यातील युद्धाचे रूपांतर महायुद्धात बदलणार नाही ना अशी भीती अभ्यासकांकडून वर्तवण्यात येत आहे. अशातच अमेरिकेला मदत न केल्याने ट्रम्प ब्रिट आणि स्पेनवर नाराज झाले आहेत.



ब्रिटनची भूमिका अत्यंत असहकार्याची :


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनचे पंतप्रधान कीअर स्टार्मर यांच्यावर तीव्र टीका केली आहे. ट्रम्प यांनी ब्रिटनची भूमिका अत्यंत असहकार्याची असल्याचे सांगत स्टार्मर यांची तुलना माजी ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्याशी केली आणि “आपण ज्यांच्याशी व्यवहार करत आहोत, ते चर्चिल नाहीत,” असे वक्तव्य केले.


अमेरिका आणि ब्रिटनमधील संबंधांना दीर्घकाळापासून “स्पेशल रिलेशनशिप” म्हटले जाते आणि पाश्चात्त्य सुरक्षा सहकार्याचा तो पाया मानला जातो. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे या संबंधांमध्ये तडा गेल्याचे संकेत मिळत आहेत.



स्पेनसोबतच्या व्यापारी संबंधांना पूर्णविराम :


याच दरम्यान ट्रम्प यांनी स्पेनवरही टीका केली. त्यांनी म्हटले की, इराणशी संबंधित लष्करी कारवायांसाठी स्पेनने आपल्या तळांचा वापर करण्यास परवानगी दिली नाही, त्यामुळे अमेरिका आता स्पेनसोबतचे व्यापारी संबंध संपवणार आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांना स्पेनसोबतचे सर्व व्यावसायिक व्यवहार थांबवण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले. “स्पेनची भूमिका अत्यंत खराब होती. आम्हाला स्पेनसोबत कोणताही व्यापार ठेवायचा नाही,” असे ट्रम्प म्हणाले.



ट्रम्प प्रशासनात मतभेद ?


ट्रम्प आणि अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांचा दावा आहे की, अमेरिकेला स्पेनच्या उत्पादनांवर कायदेशीररीत्या बंदी घालण्याचा अधिकार आहे. मात्र, अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीयर यांनी याबाबत लगेच स्पष्ट भूमिका घेण्याचे टाळले. दुसरीकडे, स्पेन सरकारने अमेरिकेला खासगी कंपन्यांची स्वायत्तता, आंतरराष्ट्रीय कायदा आणि EU-US मधील द्विपक्षीय करारांचा आदर राखण्याची आठवण करून दिली आहे.



स्पेनची भूमिका :


स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांना असमर्थनीय आणि धोकादायक लष्करी हस्तक्षेप म्हटलं आहे. हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचे स्पष्ट केले. अमेरिकेला त्यांचे तळ वापरू देणे हे संयुक्त राष्ट्रांच्या (UN) चार्टरचे उल्लंघन ठरेल, असा युक्तिवाद स्पेनने केला.



दोन्ही देशांमधील मोठी आर्थिक उलाढाल :


२०२५ च्या आकडेवारीनुसार, अमेरिका आणि स्पेनमध्ये मोठा व्यापार झाला. अमेरिकेने स्पेनला सुमारे २६ अब्ज डॉलरची उत्पादने निर्यात केली होती, तर स्पेनमधून २१ अब्ज डॉलरची आयात केली होती. यात स्पेनकडून प्रामुख्याने 'फार्मास्युटिकल उत्पादने आणि ऑलिव्ह ऑइल' अमेरिकेत येते.


दरम्यान, २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील अनेक शहरांवर एकाच वेळी हवाई हल्ले केले होते. या हल्ल्यांमध्ये इराणचे लष्करी कमांड सेंटर, क्षेपणास्त्र तळ आणि एअर डिफेन्स प्रणालींना लक्ष्य करण्यात आले. या कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई आणि चार वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. तेहरानसह अनेक मोठ्या शहरांमध्ये जोरदार स्फोट झाले.


या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने अमेरिका आणि तिच्या सहयोगी देशांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यांचा परिणाम इस्रायल, बहरीन, कुवैत, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि जॉर्डनपर्यंत दिसून आला. त्यामुळे संपूर्ण मध्यपूर्वेत तणाव अधिक वाढला असून सामान्य नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Crime News : अमेरिकेत केरळच्या महिलांची हत्या

कॅलिफोर्निया : अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामध्ये भारतातील केरळच्या दोन महिलांची हत्या करण्यात आली आहे. या

Nepal Flood : नेपाळच्या महापुरात ९०३ जणांचा मृत्यू, ४२४७ बेपत्ता; मदतकार्य सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि मदतकार्य सातत्याने सुरू आहे.

Nepal Flood Rescue : नेपाळमध्ये महापुराचा कहर; अनोळखी व्यक्तीची एक हाक ठरली जीवनदायी, ३७० विद्यार्थी-शिक्षक बचावले

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरादरम्यान एका अनोळखी व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे तब्बल ३७० हून अधिक विद्यार्थी

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.