Israel - Iran War : चर्चेसाठी खूप उशीर झाला; आता माघार नाही - डोनाल्ड ट्रम्प

इराणवर इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. मंगळवारी (३ मार्च) संध्याकाळी ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करत ट्रम्प यांनी इराणची एअरफोर्स, नेव्ही आणि नेतृत्व व्यवस्था पूर्णपणे नष्ट झाल्याचा दावा केला.


राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, इराणच्या अणु आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमावर देखरेख ठेवण्यासाठी कराराबाबत चर्चा करण्यासाठी आता खूप उशीर झाला आहे. एका ओपिनियन लेखावर प्रतिक्रिया देताना त्यांनी लिहिले, “त्यांची एअर डिफेन्स, एअरफोर्स, नेव्ही आणि नेतृत्व संपले आहे. आता ते चर्चा करू इच्छित आहेत. पण मी त्यांना सांगितले आता खूप उशीर झाला आहे!”


अमेरिका आणि इस्रायल यांनी २८ फेब्रुवारीपासून इराणविरोधात सुरू केलेली लष्करी कारवाई अद्याप सुरूच आहे. या युद्धात आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून, त्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई तसेच तेहरानमधील अनेक वरिष्ठ राजकीय आणि लष्करी नेत्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.मंगळवारपासून अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले सुरू असतानाही इराणकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. इराणी क्षेपणास्त्रे आणि ड्रोननी शेजारील अरब देशांतील अमेरिकेच्या अनेक लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले आहे.


इराणी ड्रोनने सौदी अरेबियातील अमेरिकन दूतावासालाही लक्ष्य केले असून, या हल्ल्यात इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. यापूर्वी कुवैतमधील अमेरिकन मिशनवरही हल्ला झाला होता. इराणकडून शेजारील अरब देशांवर सतत क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले केले जात असल्याचे वृत्त आहे.दरम्यान, इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांच्या हालचालींवरही निर्बंध आणले आहेत. या सामुद्रधुनीतून जगातील सुमारे २० टक्के तेल आणि द्रवीकृत नैसर्गिक वायू (LNG) व्यापार होतो.


इराणी रेड क्रिसेंट सोसायटीच्या माहितीनुसार, अमेरिका-इस्रायली हल्ल्यांमध्ये इराणमध्ये किमान ७८७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर इस्रायलमध्ये इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे ११ जण ठार झाले आहेत. इराणसमर्थित दहशतवादी संघटना हिज्बुल्लाहनेही इस्रायलवर हल्ले केले असून, त्याला दिलेल्या प्रत्युत्तरात लेबनॉनमध्ये ५२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे