मोजतबा खामेनी इराणचे नवे सर्वोच्च नेते

तेहरान : इस्रायलच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अयातुल्ला अली खामेनींच्या (८६) मृत्यूनंतर त्यांचा मुलगा मोजतबा खामेनी यांची इराणच्या सर्वोच्च नेतेपदी निवड झाली आहे. इराणच्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सच्या सदस्यांनी मोजतबा खामेनी यांना नेतेपदी नियुक्त करण्याचा ठराव मंजूर केला. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या दबावामुळे ही निवड करण्यात आली, असेही वृत्त इस्रायलच्या प्रसारमाध्यमांनी दिले आहे.


अयातुल्ला अली खामेनी यांनी १९८९ पासून २०२६ पर्यंत ३६ वर्ष देशाचे नेतृत्व केले. अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात खामेनींचा मृत्यू झाल्याचे आधी अमेरिकेकडून नंतर इस्रायलकडून जाहीर करण्यात आले. इस्रायलने ४० दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करत खामेनींच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला. यानंतर काही दिवसांनी असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सच्या सदस्यांनी मोजतबा खामेनी यांना नेतेपदी नियुक्त करण्याचा ठराव मंजूर केला.


इराणच्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्समध्ये धार्मिक नेते बसतात. ही संस्था सर्वोच्च नेत्याच्या कामावर लक्ष ठेवण्याचे काम करते. या संस्थेवर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचा प्रचंड दबाव होता. या दबामुळेच खामेनींच्या मृत्यूनंतर काही दिवसांतच विशेष सभा घेऊन मोजतबा खामेनी यांना नेतेपदी नियुक्त करण्याचा ठराव मंजूर करण्यात आल्याचे वृत्त इस्रायलच्या प्रसारमाध्यमांनी दिले आहे.


मोजतबा खामेनी हे इराणमधले एक प्रभावी नेते आणि अयातुल्ला अली खामेनी यांचे पुत्र आहेत. वडील जिवंत असताना इराणच्या कारभारात मोजतबा यांच्या निर्णयांना आणि मतांना प्रचंड महत्त्व होते. इराण सरकारमध्ये नसताना मोजतबा कारभारावर प्रचंड प्रभाव टाकत होते. आता तर ते अधिकृतरित्या इराणचे नेतृत्व करत आहेत. यामुळे इराणचे भवितव्य आता त्यांच्याच हातात आहे.


अयातुल्ला अली खामेनी यांचा दफनविधी अद्याप झालेला नाही. हा दफनविधी मशहदमधील त्यांच्या मूळ गावी होण्याची शक्यता आहे. पण दफनविधीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. अयातुल्ला अली खामेनी यांच्या वडिलांची कबर मशहदमधील इमाम रझा या तीर्थक्षेत्री आहे. यामुळे अयातुल्ला अली खामेनी यांची कबरही मशहदमधील पवित्र ठिकाणीच असेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे