क्षेपणास्त्र विरोधी क्षेपणास्त्रांचा साठा वेगाने घटत असल्यामुळे अमेरिका चिंतेत

वॉशिंग्टन डीसी : अमेरिका आणि इस्रायल यांनी संयु्क्तपणे २८ फेब्रुवारी २०२६ पासून इराणवर हवाई हल्ले सुरू केले. आज ४ मार्च २०२६ चा दिवस उजाडला आहे. लढाईचा पाचवा दिवस सुरू झाला तरी दोन्ही बाजू एकमेकांविरोधात आक्रमक पवित्र्यात दिसत आहेत. अमेरिका आणि इस्रायल यांच्या हवाई हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. इराण वेगवेगळ्या क्षमतेच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे अमेरिकेच्या आखाती देशांतील तळांवर तसेच इस्रायलवर हवाई हल्ले करत आहे. सुरुवातीला एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीत लढाई संपेल असा दावा ट्रम्प करत होते. पण आता लढाई काही महिने चालू शकते अशी भाषा ट्रम्प करत आहेत. ट्रम्प यांची भाषा बदलली असतानाच अमेरिकेची सरकारी यंत्रणा क्षेपणास्त्र विरोधी क्षेपणास्त्रांचा साठा वेगाने घटत असल्यामुळे चिंतेत आहे.


इराण जे लहान - मोठे हवाई हल्ले करत आहे ते निकामी करण्यासाठी अमेरिका आणि इस्रायलकडून वारंवार महागड्या क्षेपणास्त्रांचा वापर सुरू आहे. अमेरिका इराणचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र यांना हवेतच निकामी करण्यासाठी वारंवार महागड्या क्षेपणास्त्रांचा वापर करत आहे. यामुळेच क्षेपणास्त्र विरोधी क्षेपणास्त्रांचा साठा वेगाने घटत आहे. लढाई जेवढी जास्त लांबेल अमेरिकेचा क्षेपणास्त्र साठा वेगाने कमी होण्याचा धोका आहे.


अमेरिका आणि इराण यांच्यातील वाटाघाटी फिस्कटल्या आणि लढाई सुरू झाली. इराण या लढाईत ठरवून जुन्या कमी क्षमतेच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा वापर करून अमेरिकेकडील महागड्या क्षेपणास्त्रांचा साठा कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. इराणचे बहरीन, सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिराती आणि इराकमधील अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ले सुरू आहेत.


रशिया आणि युक्रेन यांच्यात लढाई सुरू झाली त्यावेळी युक्रेनची क्षमता बघता लढाई काही दिवसांत संपेल असेच दिसत होते. प्रत्यक्षात अमेरिका आणि युरोपमधील निवडक देशांच्या मदतीमुळे युक्रेन काही वर्षे उलटली तरी रशियासोबत लढाई करत आहे. आता काही देश अमेरिकेविरोधात तीच खेळी खेळत असल्याची चर्चा आहे. इराण विरूद्धच्या लढाईत अमेरिकेला प्रदीर्घ काळ अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा प्रयत्न यशस्वी झाला तर अमेरिकेच्या आर्थिक प्रगतीवर प्रतिकूल परिणाम होण्याचा तसेच अमेरिकेच्या महाशक्ती या प्रतिमेला तडा जाण्याचा धोका आहे. अशातच क्षेपणास्त्र विरोधी क्षेपणास्त्रांचा साठा कमी झाला तर अमेरिकेला स्वतःच्या आखाती देशांतील तळांचे रक्षण करणे कठीण जाणार आहे.


अमेरिकेने मागील काही वर्षात रशिया विरोधात युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्र पुरवठा केला. इस्रायलला दहशतवादी संघटनांच्या विरोधात लढण्यासाठीही अमेरिकेने मोठी मदत दिली होती. हे करणाऱ्या अमेरिकेने त्या काळात स्वतःचा क्षेपणास्त्र विरोधी क्षेपणास्त्रांचा साठा वाढवण्याकडे दुर्लक्ष केले होते. याचा फटका अमेरिकेला इराण विरूद्धच्या लढाईत बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर इराणची वाढती आक्रमकता आणि घटत असलेला क्षेपणास्त्र विरोधी क्षेपणास्त्रांचा साठा या दोन कारणांमुळे अमेरिकेची चिंता वाढली आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे