T20 : दक्षिण आफ्रिका पुन्हा ठरली चोकर्स, फिन एलनचे वादळी शतक आणि न्यूझीलंडची दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक

कोलकाता  : न्यूझीलंडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला सहज पराभूत केले. स्पर्धेत अपराजित राहिलेला एकमेव संघ असलेला आफ्रिकेचा संघ मोक्याच्या सामन्यात पुन्हा एकदा 'चोकर्स' ठरला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील न्यूझीलंडचा हा आफ्रिकेवरील पहिलाच विजय ठरला, यापूर्वी पाच सामन्यांत आफ्रिकेने बाजी मारली होती. पण, आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीचा इतिहास पाहिला, तर न्यूझीलंडने बाद फेरीत आफ्रिकेला नेहमी पराभूत केले आहे. तिच परंपरा बुधवारीही कायम राखताना न्यूझीलंडने फायनलमध्ये प्रवेश केला. आता त्यांच्यासमोर भारत किंवा इंग्लंड यांच्यातल्या विजेत्याचे आव्हान असणार आहे. टी २० विश्वचषकामध्ये न्यूझीलंड दुसऱ्यांदा फायनलला गेली आहे. यापूर्वी २०२१ मध्ये फायनलला गेलेल्या न्यूझीलंडला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.


न्यूझीलंड संघाने स्पर्धेत अजिंक्य राहिलेल्या दक्षिण आफ्रिका संघावर एकतर्फी विजय मिळवला आहे. न्यूझीलंड संघाने द. आफ्रिकेवर ९ विकेट्स आणि ४८ चेंडू राखून विजय मिळवला. संघाचे सलामीवीर फिन एलन व टीम सेफर्ट संघाच्या विजयाचा मार्ग तयार करून दिला. फिन एलनने अखेरच्या चेंडूवर वादळी शतक झळकावत संघाचा विजय निश्चित केला. यासह दक्षिण आफ्रिकेचा संघ फायनलच्या एक पाऊल जवळ येऊन स्पर्धेबाहेर झाला आहे.


दक्षिण आफ्रिकेच्या संघाने संपूर्ण स्पर्धेत एकही सामना गमावला नव्हता, त्यामुळे सेमीफायनल जिंकण्यासाठी संघ फेव्हरेट मानला जात होता. पण न्यूझीलंडने बाजी मारली. किवी संघाने प्रथम गोलंदाजी करताना वादळी सुरूवात केली आणि द. आफ्रिकेला १६९ धावांवर रोखले. तर प्रत्युत्तरात १२.५ षटकांत १७० धावा चेस करत विक्रमी विजय मिळवला. किवी संघाच्या या विजयाचा हिरो ठरला शतकवीर फिन एलन.


दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या १७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाची वादळी सुरूवात झाली. सलामीवीर फिन एलन व टीम सेफर्ट यांनी पहिल्या विकेटसाठी ११७ धावांची विक्रमी भागीदारी रचली. यासह किवींनी पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता ८६ धावा केल्या होत्या. सेफर्ट ३३ चेंडूत ७ चौकार व २ षटकारांसह ५८ धावा करत बाद झाला. पण फिन एलनने विक्रम रचत ३३ चेंडूत १० चौकार व ८ षटकारांसह शतकी खेळी साकारली. तर रचिन रवींद्रने १३ धावा करत त्याला साथ दिली.


संपूर्ण स्पर्धेत कमालीच्या गोलंदाजी आक्रमणासह उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीला न्यूझीलंड संघाने सुरूंग लावला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने संपूर्ण सामन्यात साजेशी कामगिरी न केल्यामुळे संघाला हा मोठा पराभव पत्करावा लागला आणि पुन्हा एकदा त्यांना चोकर्सचा टॅग मिळाला आहे.



न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिकेला गोलंदाजीसाठी पाचारण केले आणि दक्षिण आफ्रिका आयसीसी स्पर्धेत पुन्हा एकदा 'चोकर्स' असल्याचे दिसले. एडन मार्करम ( १८) च्या विकेटवरून वाद सुरू असला तरी आज आफ्रिकेचे सलामीवीर अपयशी ठरले. कोल मॅकोंचीने दुसऱ्याच षटकात सलग दोन चेंडूंवर क्विंटन डी कॉक ( १०) व रायन रिकेल्टन ( ०) यांना बाद केले. त्यानंतर रचिन रविंद्रने मोठा दिला. मार्करम झेलबाद झाला. डेव्हिड मिलरलाही ( ६) त्याने शांत ठेवले. किवींकडून दोन झेल सुटले,परंतु त्याचा फार मोठा फटका त्यांना बसला नाही.


आफ्रिकेचे ५ फलंदाज ७७ धावांवर माघारी परतल्यानंतर त्याचं काही खरं नाही, असेच वाटत होते. पण, त्रिस्तान स्तब्स व मार्को यान्सेन ही जोडी उभी राहिली. त्यांनी सहाव्या विकेटसाठी ७८ धावा जोडल्या. तत्पूर्वी डेवॉल्ड ब्रेव्हिसने ३४ धावांची खेळी केली होती. ब्रेव्हिस २९ धावांवर माघारी परतला अन् पुन्हा न्यूझीलंडने पुनरागमन केले. यान्सेनने ३० चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह ५५ धावांची नाबाद खेळी केली. त्याने २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या बाद फेरीतील ही पाचवी आणि आफ्रिकेकडून दुसरी वेगवान फिफ्टी ठरली.


ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या बाद फेरीत सातव्या क्रमांकावर येऊन अर्धशतक करणारा मार्को दुसरा फलंदाज ठरला. यान्सेनच्या फटकेबाजीमुळे आफ्रिकेने ८ बाद १६९ धावांपर्यंत मजल मारली.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून