मुख्यमंत्री फडणवीसांंचा निर्णय; धडाकेबाज IAS अधिकाऱ्याची नागपूरमधून बदली

नागपूर: नागपूर महापालिकेचे आयुक्त अभिजीत चौधरी यांची बदली करण्यात आली आहे. अभिजीत चौधरी यांच्यावर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण महानगर आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौधरी यांच्या बदलीचा निर्णय घेतला.


देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हातात घेतल्यापासून गेल्या वर्षभरात बदल्यांचा धडाका सुरू आहे. प्रत्येक सप्ताह-दोन सप्ताहात आठ दहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. बदल्यांच्या धडाक्याची परंपरा या आठवड्यात देखील अबाधित आहे.


बदलीच्या आदेशात काय म्हटलंय?



सनदी अधिकारी अभिजीत चौधरी शासनाने आपली बदली केली असून, आपली नियुक्ती महानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे या पदावर श्री. योगेश म्हसे, भाप्रसे यांच्या जागी ते पद निवड श्रेणीत अवनत करून केली आहे. तरी आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार डॉ. विपीन इटणकर, भाप्रसे यांच्याकडे सोपवून, नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा.


अभिजीत चौधरी यांचे नागपूरमधील काम कसे राहिले?



अभिजीत चौधरी नागपूरमध्ये काम करीत असताना त्यांच्यावर अनेकदा टीका झाली. सत्ताधाऱ्ंयाच्या इशाऱ्यावर चालतात, असा आरोप त्यांच्यावर विरोधी पक्षांनी लावला. शांत स्वभावाच्या अभिजीत चौधरी यांनी बोलण्यापेक्षा कृतीतून उत्तरे दिली. पालिकेचा आर्थिक डोलारा डळमळीत असताना राज्यासह केंद्राच्या अनेक योजना त्यांनी यशस्वी राबविल्या. महापालिकांच्या रँकिंगमध्ये नागपूरचा पहिला नंबर यावा यासाठी त्यांनी अनेकदा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही.


अभिजीत चौधरी कोण आहेत?



अभिजीत चौधरी यांनी नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्त आणि प्रशासक पदाची यशस्वी धुरा सांभाळली. ४ जुलै २०२३ ला ते नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून नागपुरात आले होते. डॉ. अभिजीत चौधरी हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील भुसावळचे रहिवासी आहेत. त्यांचे शिक्षण वैद्यकीय क्षेत्रात झाले असून, २००८ मध्ये त्यांनी एमबीबीएस पदवी संपादन केली. मात्र, प्रशासकीय सेवेच्या ओढीने त्यांनी स्पर्धा परीक्षांकडे आपला मोर्चा वळवला.


डॉ. चौधरी यांची विशेष ओळख म्हणजे त्यांनी भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) या दोन्ही प्रतिष्ठित सेवांमध्ये यश मिळवले आहे. २०१० साली भारतीय पोलीस सेवेसाठी (IPS) त्यांची निवड झाली तर २०११ साली भारतीय प्रशासकीय सेवेसाठी (IAS) त्यांची निवड झाली.


अभिजीत चौधरी यांनी राज्यात कोणकोणत्या पदांवर काम केले?



गेल्या दशकभरापेक्षा जास्त काळापासून त्यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. उस्मानाबादचे सहाय्यक जिल्हाधिकारी, नांदेडचे सहाय्यक जिल्हाधिकारी, औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, भंडारा जिल्हाधिकारी, कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त, सांगलीचे जिल्हाधिकारी, औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त अशा विविध पदांवर त्यांनी काम केले.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी