रविवारी मोदी स्टेडियमवर भारत - न्यूझीलंड फायनल रंगणार, सेमी फायनलमध्ये भारताचा विजय

मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चौकार-षटकारांचा पाऊस पडला. भारताच्या २५३ धावांना इंग्लंडकडूनही सडेतोड उत्तर मिळाले. संजू सॅमसनच्या वादळी खेळीला इंग्लंडच्या जेकब बेथल अविश्वसनीय खेळीसह प्रत्युतर दिले. पण, जसप्रीत बुमराहची दोन षटकं राखून ठेवण्याचा डाव यशस्वी झाला आणि भारताने हा सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताने शवेटच्या पाच षटकांत पुनरागमन केले आणि आता ८ मार्च रोजी जेतेपद कायम राखण्यासाठी न्यूझीलंडला भिडणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होईल.



भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलचा सामना भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला. पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने २५३ धावांचा डोंगर उभारला होता.तथापि २३ फेब्रुवारी २०२६ रोजी याच वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिजने झिम्बाब्वे विरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत २५४ धावा केल्या होत्या. ही वानखेडेवरील सर्वोच्च धावसंख्या गाठण्यास भारताला एक धाव कमी पडली. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी आणि फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी विक्रमी २५४ धावांचा यशस्वी पाठलाग करायचा होता. या धावांचा पाठलाग करताना जेकब बेथल आणि विल जॅक्सने पूर्ण जोर लावला. पण भारतीय संघाने हा सामना ७ धावांनी जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला आहे.



इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी २५४ धावा करायच्या होत्या. इंग्लंडला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला. फिल सॉल्ट अवघ्या ५ धावा करून माघारी परतला. जोस बटलरने काही आकर्षक फटके मारले. पण तो २५ धावांवर बाद होऊन माघारी परतला. कर्णधार हॅरी ब्रुकही अवघ्या ७ धावांवर बाद झाला. टॉम बँटम १७ धावांवर माघारी परतला. शेवटी जेकब बेथल आणि विल जॅक्सने मिळून इंग्लंडचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून इंग्लंडला विजयाच्या जवळ पोहोचवले. विल जॅक्स ३५ धावा करून माघारी परतला. पण बेथलने दमदार शतकी खेळी केली आणि इंग्लंडला विजयाच्या अगदी जवळ पोहोचवलं. पण इंग्लंडचा थोडक्यात पराभव झाला.भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ७ बाद २५३ धावा उभ्या केल्या, ज्या वर्ल्ड कप नॉक आऊट फेरीतील सर्वोच्च धावसंख्या ठरल्या. संजू सॅमसनने ४२ चेंडूंत ८ चौकार व ७ षटकारांसह ८९ धावांची वादळी खेळी केली. त्याने इशान किशनसह ४५ चेंडूंत ९७ धावा जोडल्या. इशान १८ चेंडूंत ३९ धावा करून माघारी परतला. शिवम दुबेने २५ चेंडूंत ४३ धावा करताना १ चौकार व ४ षटकार लगावले. हार्दिक पांड्या ( २७), तिलक वर्मा ( २१) यांनीही चांगले योगदान दिले.


भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या आजच्या डावात १९ षटकार खेचले. जे वर्ल्ड कपमधील एका डावातील संयुक्तपणे सर्वाधिक षटकार ठरले. हार्दिक पांड्याने दुसऱ्याच षटकात इंग्लंडला धक्का दिला आणि फिल सॉल्टला ( ५) माघारी पाठवले. जसप्रीत बुमराहने पाचव्या षटकात कर्णधार हॅरी ब्रूकला ( ७) बाद केले. अक्षर पटेलने पळत जाऊन अविश्वसनीय झेल टिपला. बेथेलने सलग तीन षटकार खेचून वरूण चक्रवर्थीचे स्वागत केले. पण, त्याच षटकात बटरलचा ( २५) त्याने त्रिफळा उडवला.


अक्षर पटेलने आठव्या षटकात टॉम बँटनचा ( १७) त्रिफळा उडवून इंग्लंडला ९५ धावांवर चौथा धक्का दिला. जेकबने १९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि वर्ल्ड कपमधील इंग्लिश फलंदाजाकडून झालेले हे वेगवान अर्धशतक ठरले. इंग्लंडने ४ विकेट गमावल्या असल्या तरी त्यांच्या धावांची गती ही १२ च्या सरासरीने सुरू होती. जेकब व विल जॅक्स यांनी २७ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी करताना भारतीय गोलंदाजांनाही दडपणाखाली ठेवले.


अर्शदीपने १४ व्या षटकात ७७ धावांची ही भागीदारी तोडली. विल जॅक्स २० चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३५ धावांवर झेलबाद झाला. आता सहा षटकांत ८२ धावा असा सामना इंग्लंडच्या हातून निसटताना दिसला. १५व्या षटकात १३ धावा आल्या आणि ३० चेंडू ६९ धावा असा सामना चुरशीचा झाला. जसप्रीतने १६ व्या षटकात फक्त ८ धावा देताना भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले. अर्शदीपने १७व्या षटकात १६ धावा दिल्याने सामना १८ चेंडूंत ४५ धावा असा जवळ आला, परंतु जसप्रीतने १८व्या षटकात फक्त ६ धावा दिल्या आणि स्पेल ४-०-३३-१ असा संपवला.


आता १२ चेंडूंत ३९ धावा असा सामना भारताच्या हातात आलेला आणि हार्दिक १९ वे षटक फेकायला आला. बेथलने षटकाराने आपले शतक पूर्ण केले, त्याने ४५ चेंडूंत तिहेरी धावसंख्या गाठली. तिसऱ्या चेंडूवर सॅम कुरनचा ( १८) सीमारेषेवर तिलकने झेल टिपला. कुरन व बेथलने २७ चेंडूंत ५० धावा जोडल्या. हार्दिकने फक्त ९ धावा देत १ विकेट घेतली आणि मॅच ६ चेंडू ३० धावा अशी इंग्लंडच्या हातून निसटली. शिवम दुबेच्या पहिल्या चेंडूवर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात बेथल रन आऊट झाला. त्याने ४८ चेंडूंत ८ चौकार व ७ षटकारांसह १०५ धावांची अविश्वसनीय खेळी केली. भारताने ही मॅच जिंकून फायनलमध्ये प्रवेश पक्का केला. इंग्लंडने २० षटकांत ७ बाद २४६ धावांपर्यंत मजल मारली आणि भारताने ८ धावांनी मॅच जिंकली.

Comments
Add Comment

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त