Israel - Iran War : इस्रायली सैन्याकडून इराणच्या क्रांतिकारी गार्ड्सचे मुख्यालय उद्ध्वस्त

इस्रायलने बुधवारी (४ मार्च) सांगितले की त्यांनी तेहरानमधील एका प्रमुख इराणी लष्करी संकुलावर हल्ला केला आहे, ज्यामध्ये रिव्होल्यूशनरी गाईंस, कुट्टस फोर्स आणि बसिज निमलष्करी दलांचे कमांड सेंटर आहेत. इस्रायली लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की, "इस्रायती हवाई दलाने गुप्तचर यंत्रणेच्या अचूक मार्गदर्शनाखाली पूर्व तेहरानमधील एका मोठ्या लष्करी संकुलावर व्यापक हल्ला केला, ज्यामध्ये 'इराणी सुरक्षा संघटनांचे सर्व मुख्यालय' आहेत." लष्कराने सांगितले की, या संकुलात उपस्थित असलेल्या इतर इराणी सुरक्षा संस्थांमध्ये इराणचे गुप्तचर संचालनालय, अंतर्गत सुरक्षा दल आणि इराणचे सायबर युद्ध युनिट यांचा समावेश आहे.


इराण - इस्रायल आणि अमेरिका या भयंकर युद्धाच्या पाचव्या दिवशी इराणमधील मृतांची संख्या १०४५ वर पोहोचली आहे. इराणी माध्यमांनी जाहीर केलेल्या या आकडेवारीत केवळ ओळख पटलेल्यांचा समावेश आहे.


इराणने अमेरिकेचे मित्र असलेल्या अरब देशांवर, तसेच आखातातील शेजारी देशांवर हल्ला करण्याचा निर्णय घेतल्यामुळे हे युद्ध आता फक्त दोन देशांपुरतं न राहता संपूर्ण प्रदेशात पसरलं आहे. दरम्यान, अमेरिकेला आपल्या लष्करी तळांचा वापर करू देणार नाही, हा आधीचा निर्णय युनायटेड किंगडमने आता मागे घेतला आहे.



आतापर्यंतचा घटनाक्रम :


- अमेरिका आणि इस्राएलने इराणमधील सुमारे २ हजार ठिकाणे लक्ष्य केले आहेत.
- हल्ल्यांचा फोकस परमाणु सुविधा, बैलिस्टिक क्षेपणास्त्र लाँचर आणि लष्करी नेतृत्वाच्या ठिकाणी होता.
- याला प्रत्युत्तर म्हणून इराणने हॉर्मुज जलसंधी बंद केली आहे.
- इराणकडून तेहरानने तेल अवीव आणि यरुशलमसह इस्राएलच्या शहरांवर क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले
- आखाती देशांमधील अमेरिकी ठिकाणेही हल्ल्यांमध्ये लक्ष्यात आले आहेत.
- इराणी युद्ध नौकेवरील हल्ला : आतपर्यंत ८० ठार, अनेक बेपत्ता

Comments
Add Comment

WhatsApp : परदेशात गेल्यावर सिम कार्डची कटकट कायमची बंद होणार? व्हॉट्सॲप आणतंय 'हे' धमाकेदार फीचर!

परदेश प्रवास करणार्‍यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. जगभरात मेसेजिंगसाठी सर्वाधिक वापरल्या

Germany Strange Rules: बागेत बाकावर बसून रडणाऱ्या महिलेला दंड! जर्मनीतील अजब नियम चर्चेत

Germany Strange Rules: कधीकधी, आपण एकटे असतो, अस्वस्थ वाटत असते, तेव्हा कोणाशीतरी बोलण्याऐवजी थोडा वेळ एकटे बसावेसे वाटते.

16 डिसेंबरपूर्वी बांगलादेशात महाभूकंप! हसीनांच्या निकटवर्तीयांना अटक; 108 तुकड्या तैनात झाल्याने खळबळ

ढाका : माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या बांगलादेशात परतण्याच्या नियोजित दौऱ्याला काहीच काळ शिल्लक असताना, तारिक

इंडोनेशियात बेकायदा सोन्याच्या खाणीत पाणी शिरलं; 13 कामगारांचा मृत्यू, 13 बेपत्ता

इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रांतात एका अनधिकृत सोन्याच्या खाणीत पाणी शिरल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या

पोलिश तरुणी वंदे भारत पाहून थक्क! चहा-पोह्याचा आस्वाद घेत रचला व्हायरल व्हिडिओ; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव!

भारतीय रेल्वेच्या आधुनिकतेचा आणि बदलत्या स्वरूपाचा अनुभव आता परदेशी पर्यटकांनाही भुरळ घालत आहे. पोलंडमधील एका

Senator speech holding 6 month baby parliament : ६ महिन्याच्या मुलीला कडेवर घेऊन सिनेटरचे संसदेत भाषण; लिडिया थॉर्पसोबत चिमुकलीचा लपाछपीचा खेळ, भावूक व्हिडिओ व्हायरल

मुंबई : राजकीय सभागृहाचे कामकाज म्हटले की तणावपूर्ण चर्चा, खडाजंगी आणि कडक शिस्त असेच चित्र नेहमी पाहायला मिळते.