नवी मुंबईत घरगुती ट्युशन क्लासचा स्लॅब कोसळला, एका मुलाचा मृत्यू आणि १० मुले जखमी

कोपरखैरणे : नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे सेक्टर दोनमधील प्लॉट क्रमांक १२ येथे विद्याभवन अपार्टमेंटमधील तळमजल्यावर असलेला स्लॅब कोसळला. स्लॅब कोसळला त्यावेळी तळ मजल्यावरील घरात घरगुती ट्युशन क्लास सुरू होता. यामुळे एकूण ११ विद्यार्थी जखमी झाले. जखमींपैकी मनिष म्हसे नावाच्या नऊ वर्षीय विद्यार्थ्याचा थोड्या वेळापूर्वी मृत्यू झाला. इतर १० जखमींवर उपचार सुरू आहेत. क्लासमध्ये असलेला आराध्य धनवडे हा विद्यार्थी सुखरुप असून त्याला पालकांनी घरी नेले आहे.


अपेक्स रुग्णालय येथे निशिका धनवडे (१३), आयेशा खान (११), देवांश पुजारी (१२), सिद्धांत गुप्ता (९), राजदीप वरखडे (११) यांच्यावर उपचार सुरू आहेत. लायन्स क्लब रुग्णालयात तन्वी श्रीवास्तव (१०), रुद्र पाटील, प्रिन्स सोनी (१४) यांच्यावर उपचार सुरू आहेत. ऍसलोन रुग्णालयात कुलसुम खान (१३) वर उपचार सुरू आहेत. पार्थ खैरनार (१२) वर साईज्योत रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी फक्त पार्थ हा एकमेव मुलगा आहे जो पहिल्या मजल्यावरील घरात होता. तळमजल्यावरील स्लॅब पडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत घर क्रमांक १०२ मधील पार्थ जखमी झाला.


प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार ५ मार्च रोजी संध्याकाळी साडेचार ते पाच दरम्यान स्लॅब कोसळून दुर्घटना झाली. कोपरखैरणे, वाशी आणि ऐरोली येथील अग्निशमन दलाच्या पथकांनी संयुक्त कारवाई केली आणि सर्व जखमींना तातडीने ढिगाऱ्यातून बाहेर काढून रुग्णालयांमध्ये दाखल केले. घटनेची माहिती मिळताच नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत आणि आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी घटनास्थळाला भेट देऊन दुर्घटनेची माहिती घेतली. रुग्णालयांमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली. जखमींच्या नातलगांना धीर दिला. दुर्घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून विद्याभवन अपार्टमेंट रिकामी करण्यात आली आहे. सर्व रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. अण्णासाहेब पाटील सांस्कृतिक भवन कोपरखैरणे यांनी तात्पुरत्या निवासाची व्यवस्था केली आहे. इमारतीचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित विभागाला दिले आहेत.

Comments
Add Comment

NCP Core Committee Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची देवगिरी येथे महत्त्वपूर्ण बैठक; संघटनात्मक बांधणीवर चर्चा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईतील देवगिरी निवासस्थानी पार

Ashok Kharat Case : पीडित स्त्रियांवर...अशोक खरातच्या आज सुनावणीत न्यायालयात काय घडलं ?

Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने सर्वानाच हादरवून सोडले होते. भविष्य सांगण्याचा बहाणा करत भोंदू

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.