Pakistan Player : खेळाडू की हैवान; पाकिस्तानी खेळाडूंकडून मैदानाबाहेर महिलांचा विनयभंग

आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकातून पाकिस्तानचा संघ बाहेर पडला असला, तरी आता एका नव्या वादामुळे पाकिस्तानी खेळाडू पुन्हा चर्चेत आले आहेत. श्रीलंकेतील कँडी येथे मुक्कामादरम्यान पाकिस्तानच्या एका खेळाडूने हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप समोर आला आहे. ‘टेलिकॉम एशिया स्पोर्ट’च्या अहवालात याबाबत दावा करण्यात आला आहे.



नेमकी घटना काय?


मिळालेल्या माहितीनुसार, श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या सुपर ८ सामन्यापूर्वी ही घटना घडली. कँडीतील ‘गोल्डन क्राऊन हॉटेल’मध्ये पाकिस्तानचा संघ थांबला असताना एका खेळाडूने हाऊसकीपिंग विभागातील महिला कर्मचाऱ्याशी विनयभंग केला.


महिलेने मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर हॉटेलमधील इतर कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर या प्रकरणाची माहिती पाकिस्तान संघाचे व्यवस्थापक नवीद चीमा यांना देण्यात आली.



हॉटेल व्यवस्थापनाची कठोर कारवाईची मागणी :


या घटनेनंतर हॉटेल व्यवस्थापनाने संबंधित खेळाडूवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, संघ व्यवस्थापकांनी खेळाडूच्या वतीने माफी मागत त्याच्यावर तातडीने दंड लावून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.



पीसीबीकडून पुढील कारवाईची शक्यता :


पाकिस्तान संघ मायदेशी परतल्यानंतर या घटनेची गंभीर दखल घेतली जात आहे. संबंधित खेळाडूला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) शिस्तभंग समितीसमोर हजर राहावे लागू शकते. टीम मॅनेजरने दंड ठोठावला असला तरी बोर्डाकडून अतिरिक्त कारवाई किंवा बंदीची शक्यता वर्तवली जात आहे.



पूर्वीही वादात पाकिस्तानी खेळाडू :


पाकिस्तानी खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफ गैरवर्तनाच्या आरोपांमुळे यापूर्वीही वादात सापडले आहेत. गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यादरम्यान मँचेस्टर पोलिसांनी फलंदाज हैदर अली याला बलात्काराच्या आरोपावरून अटक केली होती, मात्र पुराव्याअभावी त्याची सुटका झाली होती.


तसेच काही वर्षांपूर्वी मलेशिया दौऱ्यावेळी पाकिस्तान संघाच्या मसाज देणाऱ्या मलंग अली यांच्यावरही महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप झाला होता आणि त्यांना दंडही ठोठावण्यात आला होता.


या नव्या घटनेमुळे पाकिस्तानी संघाच्या शिस्तीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून