Pune Crime: बर्थडे पार्टीत सनमचा मृत्यू, शरीरात आढळलं पुरुषाचं हृदय; थरारक प्रकरण 13 वर्षानंतरही रहस्यच

पुणे: भारतीय गुन्हेगारी इतिहासातील सर्वात रहस्यमय आणि अंगावर शहारे आणणारं प्रकरण म्हणून 'सनम हसन केस' ओळखली जाते. एका १९ वर्षांच्या तरुणीचा वाढदिवसाच्या रात्री मृत्यू होतो आणि त्यानंतर सुरू होतो असा एक तपास, जो पाहून सीबीआयचे अधिकारीही चक्रावून गेले. या प्रकरणातील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे सनमच्या शरीरात चक्क एका 'पुरुषाचे हृदय' आढळले होते. मुंबईची असलेली सनम हसन पुण्यात फॅशन डिझाईनिंगचे शिक्षण घेत होती. ३ ऑक्टोबर २०१२ रोजी तिचा वाढदिवस होता. मित्रांनी आग्रह केला, वडिलांनी 'नाईट आऊट'ची परवानगी दिली आणि पुण्याच्या एका आलिशान अपार्टमेंटमध्ये पार्टी सुरू झाली. मात्र, ४ ऑक्टोबरच्या पहाटे सनमच्या घरी फोन गेला की तिची तब्येत खराब आहे. पालकांनी पुण्यात धाव घेतली, तोपर्यंत त्यांच्या काळजाचा तुकडा या जगातून निघून गेला होता.



पोस्टमॉर्टममध्ये थक्क करणारा रिपोर्ट


ससून रुग्णालयात सनमचे पोस्टमॉर्टम झाले आणि तिथूनच या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. रिपोर्टमध्ये नमूद होते की, सनमच्या शरीरात जे हृदय आहे ते एका पुरुषाचे असून ते ७० टक्के ब्लॉक होते. ही बाब सनमच्या पालकांना पचनी पडण्यासारखी नव्हती, कारण सनम एक फुटबॉल खेळाडू होती आणि ती पूर्णपणे तंदुरुस्त होती. मग एका तरुण मुलीच्या शरीरात मुलाचे हृदय आले कुठून? असा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.



बलात्कार की घातपात?


सनमच्या शरीरावर सीमेनचे नमुने आणि चार इंजेक्शनच्या खुणा आढळल्या होत्या, ज्यामुळे तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा दाट संशय निर्माण झाला. पार्टीत हजर असलेल्या १७ जणांची डीएनए चाचणी करण्यात आली, मात्र कोणाचेही नमुने मॅच झाले नाहीत. तपासात पुढे असे सांगितले गेले की, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हृदयांची अदलाबदल झाली असावी. पण पुरावा म्हणून दिलेले ते हृदय नेमके कोणाचे होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.



सीबीआयलाही अपयश


२०१४ मध्ये हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. २०१६ मध्ये तिचा मृतदेह पुन्हा थडग्यातून बाहेर काढून तपासणी करण्यात आली. मात्र, वेळेत पुरावे गोळा न केल्याने आणि फॉरेन्सिक पुराव्यांशी झालेल्या छेडछाडीमुळे सीबीआयलाही ठोस काही सापडले नाही. आज १० वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी, सनम हसनचा मृत्यू एक नैसर्गिक 'हार्ट अटॅक' होता की सुनियोजित 'मर्डर मिस्ट्री', हे गुपित आजही कायम आहे. ही जर हत्या असेल तर आरोपी अजूनही पकडला गेला नाही.

Comments
Add Comment

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि