भारत ऐतिहासिक कामगिरी करणार ?

मुंबई : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप मध्ये २००७ पासून आतापर्यंत भारत तीन वेळा फायनलमध्ये धडकला आहे. टीम इंडिया २००७, २०१४ आणि २०२४ मध्ये फायनलमध्ये पोहोचली. यापैकी २००७ आणि २०२४ मध्ये भारताने आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप जिंकला तर २०१४ मध्ये भारत आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकपचा उपविजेता झाला. आता इंग्लंड विरुद्धची सेमी फायनल जिंकल्यास भारतीय संघ चौथ्यांदा आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडकणार आहे.


आतापर्यंत प्रत्येकी दोन वेळा आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप जिंकण्याची कामगिरी भारत, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या तीन संघांनी केली आहे. कोणत्याही संघाने तिसऱ्यांदा आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप जिंकण्याची कामगिरी केलेली नाही. यामुळे इंग्लंड विरुद्धची सेमी फायनल जिंकून फायनलमध्ये जात पुढे विश्वविजेता होण्याची संधी भारताकडे आहे. भारत इंग्लंडला हरवून फायनलमध्ये पोहोचला तर आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या फायनलमध्ये तब्बल चार वेळा धडक मारणारा एकमेव संघ अशीही टीम इंडियाची ख्याती होणार आहे. भारत ही ऐतिहासिक कामगिरी करतो की नाही याकडे अनेकांचे लक्ष आहे.




  1. वर्ष २००७ विजेता भारत - उपविजेता पाकिस्तान

  2. वर्ष २००९ विजेता पाकिस्तान - उपविजेता श्रीलंका

  3. वर्ष २०१० विजेता इंग्लंड - उपविजेता ऑस्ट्रेलिया

  4. वर्ष २०१२ विजेता वेस्ट इंडिज - उपविजेता श्रीलंका

  5. वर्ष २०१४ विजेता श्रीलंका - उपविजेता भारत

  6. वर्ष २०१६ विजेता वेस्ट इंडिज - उपविजेता इंग्लंड

  7. वर्ष २०२१ विजेता ऑस्ट्रेलिया - उपविजेता न्यूझीलंड

  8. वर्ष २०२२ विजेता इंग्लंड - उपविजेता पाकिस्तान

  9. वर्ष २०२४ विजेता भारत - उपविजेता दक्षिण आफ्रिका

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून