Satyajit Tambe : 'भारत ही अमेरिकेची कॉलनी नाही'; रशियाकडून तेल खरेदीच्या मुद्द्यावरून सत्यजित तांबे आक्रमक

संगमनेर / मुंबई :


रशियाकडून कच्च्या तेलाची (Crude Oil) खरेदी करण्याबाबत अमेरिकेने भारतासाठी वापरलेल्या भाषेवरून नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. भारत हा एक स्वतंत्र आणि सार्वभौम लोकशाही देश आहे, ही अमेरिकेची कोणतीही कॉलनी नाही अशा शब्दांत तांबे यांनी अमेरिकेला सुनावले आहे.


युक्रेन-रशिया युद्धानंतर रशियावर लादलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर, भारताने आपल्या गरजेनुसार रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली आहे. या व्यवहाराबाबत भाष्य करताना अमेरिकेने नुकत्याच केलेल्या एका विधानाचा संदर्भ देत सत्यजित तांबे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली.


रशियाकडून तेल खरेदीसाठी 'परवानगी' देण्याच्या संदर्भात अमेरिकेने जे शब्द वापरले आहेत, ते भारताच्या स्वाभिमानाला ठेच पोहचवणारे असल्याचे तांबे यांनी म्हटले आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. कोणत्याही बाह्य शक्तीने भारताला काय करावे आणि काय करू नये, हे सांगण्याची गरज नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळातील अमेरिकेच्या धोरणांवर टीका करताना तांबे म्हणाले की, "अमेरिका केवळ पैसा, सत्ता आणि सैन्य ताकदीच्या जोरावर जगाला वेठीस धरण्याचे प्रकार करत आहे." भारताच्या केंद्र सरकारने आपल्या परराष्ट्र धोरणाबाबत अधिक सजग राहण्याची गरज आहे. देशाच्या स्वाभिमानाशी कोणत्याही प्रकारची तडजोड होता कामा नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


दरम्यान, भारताने जागतिक व्यासपीठावर वारंवार स्पष्ट केले आहे की, आपली तेल खरेदी ही केवळ देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आणि जनतेच्या हितासाठी आहे. मात्र, अमेरिकेच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे आता देशांतर्गत राजकीय स्तरातूनही अशा प्रकारे तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सत्यजित तांबे यांच्या या विधानामुळे परराष्ट्र धोरण आणि देशाचा स्वाभिमान या विषयावर आता सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.


भारत हा एक स्वतंत्र तसेच लोकशाही देश आहे, ही काय अमेरिकेची किंवा इतर कोणत्याही देशाची कॉलनी नाही. भारताच्या स्वाभिमानाला धोका निर्माण होऊ देऊ नये."
—सत्यजित तांबे

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण