Maha Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामधील महत्वाच्या घोषणा

मुंबई : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प आज म्हणजेच शुक्रवार ६ मार्च २०२६ रोजी दुपारी दोन वाजल्यापासून विधानसभेत सादर करत आहेत.


विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मोठ्या महत्वाच्या घोषणा केल्या. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा कर्जमाफीची घोषणा केली आहे. त्यानुसार आता ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार असून, या योजनेचे नामकरण 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' असे करण्यात आले आहे.





मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केलेल्या महत्वाच्या घोषणा :



  • छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आणि पानिपत येथे मराठा शौर्य स्मारक उभारण्यात येणार

  • मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरूच राहणार

  • नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता

  • पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना २ लाख पर्यंत चे कर्ज माफ करण्यात आले आहे.

  • मुख्यमंत्री बळीराजा योजना २०२७ मध्येही सुरू राहणार

  • राज्य सरकारकडून ३०० कोटी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतली जाणार आहे.

  • महाराष्ट्रातील सौर कृषी पंप योजनेची गिनीज बुकात नोंद

  • महाराष्ट्रातील सौर कृषी पंप योजनेची गिनीज बुकात नोंद. मागेल त्याला सौर कृषीपंप योजने अंतर्गत ६ लाखाहून अधिक पंप

  • तिसऱ्या आणि चौथ्या मुंबईसाठी अर्थसंकल्पात नियोजन

  • अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई आणि चौथी मुंबई वाढवण परिसरात उभारणार आहे.

  • पाच ज्योतिर्लिंगांचा विकासासाठी तरतूद

  • अजित पवारांचं स्मारक उभारणार

  • यंदाचा अर्थसंकल्प अजितदादांना समर्पित

  • एम्सच्या धर्तीवर महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूरात कार्यन्वित करण्यात येणार

  • साताऱ्यातील दरे गाव परिसरात निसर्गोपचार केंद्र उभारणार

  • अहिल्याबाई होळकर यांच्या नावे कर्जमाफी योजना सुरु करणार

  • १२ किल्ले संवर्धनासाठी विशेष निधी देणार

  • कर्करोग, मधुमेह, हृद्यविकार याचे लवकर निदान करण्यासाठी ४५०० कोटीचीं योजना

  • पुढील तीन वर्षाकरिता सिंधुदुर्ग, रत्नागिरीसाठी सिंधुरत्न समृद्धी योजना २.० प्रस्तावित

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Sugar hoarding : साखरेच्या साठेबाजीला आळा; केंद्र सरकारकडून स्टॉक लिमिट २ हजार क्विंटलवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि सणांपूर्वी किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर