मोबाईल हॅक करून एक लाख लुबाडले

अमरावती : खोलापूरहद्दीत म्हैसपूर येथील व्यक्तीचा मोबाईल हॅक करून त्यांच्या बँकखात्यातून ऑनलाइन ९८ हजार ५०० रुपयांची रोकड परस्पर वापरून ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. उमेश रामराव ढोके (वय ४५), असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. उमेश ढोके यांच्याजवळ असलेल्या मोबाईलवर फोन पे ऍप होते. त्यावरून ढोके हे आर्थिक व्यवहार करीत होते. त्यांच्या बँकखात्यामध्ये आधी ४५ हजार रुपये होते. शिवाय त्यांच्या शेताचे एक लाख पाच हजार रुपये, असे दीड लाख रुपये होते. त्यापैकी काही त्यातून किरकोळ खर्च उमेश ढोके यांनी केला होता.


२८ फेब्रुवारी रोजी साडेपाच ते सहा, या वेळात त्यांचा मोबाईल कुणीतरी हॅक केला होता. त्यावेळेत ढोके यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. त्यांनी फोन पे अॅपचा मॅसेज मोबाईलवर बघितला असता त्यांच्या बँकखात्यातून एका अनोळखी व्यक्तीने ९८ हजार ५०० रुपयांचे कुणाला तरी पेमेंट केले. उमेश रामराव ढोके यांनी सदर घटनेची तक्रार सायबर पोलिसांकडे केली. खोलापूर ठाण्यात ढोके यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Comments
Add Comment

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी