Maha Budget 2026 : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा या लोकांना मिळणार लाभ

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्याचा २०२६ - २७ आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात राज्याची अर्थव्यवस्था ७.९ टक्क्यांच्या वेगाने वाढत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून आता शेतमजुरांना लाभ मिळणार आहे.


शेतात काम करताना दुर्घटना झाली आणि त्यात जखमी झाल्यामुळे उपचार करण्याची वेळ आली तर पात्र असलेल्या शेतकरी तसेच शेतमजूर यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळेल. या अंतर्गत संबंधित व्यक्तीला दुर्घटना झाली तर आर्थिक संरक्षण मिळणार असून ग्रामीण कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे. राज्यातील ३० लाख शेतकऱ्यांना 'महाविस्तार' या एआय तंत्रज्ञानाद्वारे शेतीविषयक सर्व तांत्रिक आणि बाजारपेठेतील माहिती त्वरित उपलब्ध करून दिली जाईल. ज्या शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाहीत, त्यांच्यासाठी 'वसुधा' ही विशेष मेसेज सेवा सुरू करण्यात येणार आहे. याद्वारे सरकारी योजनांची माहिती थेट त्यांच्या फोनवर पाठवली जाईल.


महिला शेतकऱ्यांच्या उद्योजकतेसाठी विशेष कार्यक्रम राबवून त्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच शासनाच्या सर्व योजना डिजिटल माध्यमांतून थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण