NSE पाठोपाठ BSE आता BKC मध्ये येणार

मुंबई : वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) मध्ये व्यावसायिक जागेची मागणी प्रचंड वाढत असताना, बीएसईने मुंबईत विस्तार करण्यासाठी बीकेसी येथे भूखंडाबाबत एमएमआरडीएकडे विचारणा केली आहे. बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सुंदररामन राममूर्ती यांनी मुख्य नियामक अधिकारी कमला कंथाराज यांच्यासह डॉ. संजय मुखर्जी,भा. प्र. से., महानगर आयुक्त, एमएमआरडीए यांची भेट घेऊन या संदर्भात सविस्तर चर्चा केली. नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाने बीकेसी परिसरात नुकत्याच केलेल्या विस्तारापाठोपाठ ही घडामोड झाली आहे. बीकेसीचे भारतातील अग्रगण्य वित्तीय व व्यापारी केंद्र म्हणून स्थान अधिक बळकट झाले आहे.


गेल्या काही वर्षांत,आघाडीच्या वित्तीय संस्था, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि जागतिक गुंतवणूक संस्थांनी बीकेसीला प्राधान्य दिले आहे, जे बीकेसीचे मोक्याचे ठिकाण, दर्जेदार पायाभूत सुविधा आणि भारताच्या आघाडीचे आर्थिक परिसंस्थेचे केंद्र म्हणून शिक्कामोर्तब करते. अशा धोरणात्मक गुंतवणुकीच्या माध्यमातून मुंबईत जागतिक दर्जाच्या वाणिज्य पायाभूत सुविधांच्या विकसित करण्यावर एमएमआरडीएचा विशेष भर आहे. बीएसईच्या मागणीच्या अनुसरून योग्य भूखंड शोधून त्याच्या वाटपाची प्रक्रियेला अंतिम रूप देण्यासाठी एमएमआरडीए बीएसई सोबत काम करण्यास उत्सुक आहे.

Comments
Add Comment

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.