धावत्या ट्रेनमध्ये आशुतोष महाराजांवर जीवघेणा हल्ला; नेमकं काय घडलं?

मुंबई: शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर लैंगिक छळाचा गंभीर गुन्हा दाखल करणारे आशुतोष ब्रह्मचारी यांच्यावर 'रीवा एक्सप्रेस'मध्ये प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास एका अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने त्यांचे नाक कापण्याचा आणि त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात आशुतोष ब्रह्मचारी गंभीर जखमी झाले असून, त्यांनी या कटामागे थेट शंकराचार्यांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.


आशुतोष ब्रह्मचारी हे रविवारी (८ मार्च) रीवा एक्सप्रेसने गाझियाबादहून प्रयागराजच्या दिशेने प्रवास करत होते. ते ट्रेनच्या फर्स्ट एसी (1st AC) कोचमध्ये बसलेले असताना, पहाटे ५ च्या सुमारास ट्रेन फतेहपूर आणि सिराथू रेल्वे स्थानकाच्या दरम्यान होती. यावेळी एका अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. हल्लेखोराने त्यांचे नाक कापण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या चेहऱ्यावर व हातावर अनेक वार केले.


बाथरूममध्ये लपून वाचवला जीव
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे आशुतोष ब्रह्मचारी रक्तबंबाळ झाले होते. त्यांनी आरडाओरडा करत कसाबसा आपला जीव वाचवला आणि स्वतःला ट्रेनच्या टॉयलेटमध्ये कोंडून घेतले. तिथूनच त्यांनी तातडीने जीआरपी (रेल्वे पोलीस) कंट्रोल रूमला फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने दखल घेतल्याने मोठा अनर्थ टळला.


शंकराचार्यांवर गंभीर आरोप
आशुतोष ब्रह्मचारी यांनी या हल्ल्यासाठी थेट स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि त्यांचे शिष्य मुकुंदानंद यांना जबाबदार धरले आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, अल्पवयीन बटूच्या लैंगिक शोषणाप्रकरणी (पॉक्सो) मी स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर एफआयआर दाखल केली होती. याचाच बदला घेण्यासाठी प्रकाश उपाध्याय, अरविंद आणि मथुरा येथील दिनेश शर्मा यांनी माझे नाक कापण्याचा कट रचला. "नाक कापणाऱ्याला एक लाख रुपये देऊ," अशी घोषणा दिनेश शर्मा यांनी केल्याचा दावाही आशुतोष यांनी केला आहे.


या घटनेमुळे धार्मिक आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जीआरपीने आशुतोष ब्रह्मचारी यांच्या तक्रारीवरून एफआयआर (FIR) नोंदवला असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. हल्लेखोर कोण होता आणि तो ट्रेनमध्ये कसा शिरला, याचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. जखमी आशुतोष ब्रह्मचारी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे.

Comments
Add Comment

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Apple iPhone18 : iPhone 18 Pro, Pro Maxच्या प्री-ऑर्डरला विलंब? १२ सप्टेंबरपासून बुकिंग सुरू होण्याची शक्यता

मुंबई : ॲपलच्या आगामी iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Maxची उत्सुकता वाढली असून, या दोन्ही प्रीमियम मॉडेल्सच्या प्री-ऑर्डरची तारीख

Nashik Crime : समृद्धी महामार्गावरील दरोड्याप्रकरणी सात जण ताब्यात, ५ फरार आरोपींचा शोध सुरू

Nashik Crime : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Nashik News : समृध्दी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना, लुटीच्या घटनांनंतर पोलीस सतर्क

Nashik News : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या