Iran Israel War : अजून सहा महिने युद्ध करण्याची आमची तयारी आणि क्षमता देखील; इराणने केला दावा

मध्यपूर्वेत अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे संपूर्ण प्रदेशात अस्थिरता निर्माण झाली आहे. सध्या तरी हा संघर्ष कमी होण्याची शक्यता दिसत नाही.


इराणने दावा केला आहे की तो अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध किमान पुढचे सहा महिने तीव्र संघर्ष सुरू ठेवू शकतो. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने रविवारी एका न्यूज एजन्सीला दिलेल्या निवेदनात हा दावा केला.गार्ड्सचे प्रवक्ते अली मोहम्मद नैनी यांनी सांगितले की, “इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या सशस्त्र दलांकडे सध्याच्या मोहिमेच्या गतीने किमान सहा महिने संघर्ष सुरू ठेवण्याची पूर्ण क्षमता आहे.”


आयआरजीसीच्या दाव्यानुसार, त्यांनी संपूर्ण मध्यपूर्वेत अमेरिकन आणि इस्रायली तळ तसेच त्यांच्याशी संबंधित २०० पेक्षा अधिक ठिकाणांना लक्ष्य केले आहे.


दरम्यान, इस्रायलनेही इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ले केले आहेत. शनिवारी तेहरान आणि शेजारील करज शहरात जोरदार स्फोट झाले. इस्रायली सैन्याने अनेक इंधन साठवण संकुलांवर हल्ले केल्याने आकाशात आग आणि धुराचे मोठे ढग दिसून आले. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये हल्लाग्रस्त भागांमध्ये मोठ्या आगीच्या ज्वाळा उसळताना दिसत आहेत.


अमेरिका आणि इस्रायलने तेहरान आणि अल्बोर्ज प्रांतांतील अनेक तेल साठवण डेपोना लक्ष्य केल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणविरुद्ध पुढे आणखी अनेक “सरप्राइज” कारवाया होण्याचा इशारा दिला आहे.


या घडामोडींमुळे मध्यपूर्वेत तणाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

WhatsApp : परदेशात गेल्यावर सिम कार्डची कटकट कायमची बंद होणार? व्हॉट्सॲप आणतंय 'हे' धमाकेदार फीचर!

परदेश प्रवास करणार्‍यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. जगभरात मेसेजिंगसाठी सर्वाधिक वापरल्या

Germany Strange Rules: बागेत बाकावर बसून रडणाऱ्या महिलेला दंड! जर्मनीतील अजब नियम चर्चेत

Germany Strange Rules: कधीकधी, आपण एकटे असतो, अस्वस्थ वाटत असते, तेव्हा कोणाशीतरी बोलण्याऐवजी थोडा वेळ एकटे बसावेसे वाटते.

16 डिसेंबरपूर्वी बांगलादेशात महाभूकंप! हसीनांच्या निकटवर्तीयांना अटक; 108 तुकड्या तैनात झाल्याने खळबळ

ढाका : माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या बांगलादेशात परतण्याच्या नियोजित दौऱ्याला काहीच काळ शिल्लक असताना, तारिक

इंडोनेशियात बेकायदा सोन्याच्या खाणीत पाणी शिरलं; 13 कामगारांचा मृत्यू, 13 बेपत्ता

इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रांतात एका अनधिकृत सोन्याच्या खाणीत पाणी शिरल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या

पोलिश तरुणी वंदे भारत पाहून थक्क! चहा-पोह्याचा आस्वाद घेत रचला व्हायरल व्हिडिओ; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव!

भारतीय रेल्वेच्या आधुनिकतेचा आणि बदलत्या स्वरूपाचा अनुभव आता परदेशी पर्यटकांनाही भुरळ घालत आहे. पोलंडमधील एका

Senator speech holding 6 month baby parliament : ६ महिन्याच्या मुलीला कडेवर घेऊन सिनेटरचे संसदेत भाषण; लिडिया थॉर्पसोबत चिमुकलीचा लपाछपीचा खेळ, भावूक व्हिडिओ व्हायरल

मुंबई : राजकीय सभागृहाचे कामकाज म्हटले की तणावपूर्ण चर्चा, खडाजंगी आणि कडक शिस्त असेच चित्र नेहमी पाहायला मिळते.