उत्पादनांच्या निर्यातीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी, राज्याच्या अर्थव्यवस्थेला लघुउद्योगांचा मोठा आधार

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील उद्योग क्षेत्राचा कणा मानल्या जाणाऱ्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी गेल्या पाच वर्षांत राज्याच्या अर्थव्यवस्थेला भक्कम आधार दिला आहे. राज्याच्या ताज्या आर्थिक पाहणी अहवालानुसार, २०२० ते २०२५ या काळात उद्यम पोर्टलवर तब्बल ६३.८५ लाख उद्योगांची नोंदणी झाली असून, या क्षेत्राच्या माध्यमातून सुमारे २ कोटी ५२ लाख जणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे, या औद्योगिक वाढीमुळे राज्याच्या निर्यातीचा आलेखही उंचावला असून, देशाच्या एकूण निर्यातीत १५ टक्के वाटा उचलत महाराष्ट्राने दुसरे स्थान कायम राखले आहे.



अहवालानुसार, सूक्ष्म उद्योगांनी रोजगाराच्या बाबतीत मोठी आघाडी घेतली आहे. राज्यात ६२.११ लाख सूक्ष्म उद्योगांची नोंदणी झाली असून, त्यातून २ कोटी १२ लाख जणांना रोजगार मिळाला आहे. लघु उद्योगांच्या माध्यमातून २४.२८ लाख, तर मध्यम उद्योगांच्या माध्यमातून १५.६० लाख हातांना काम मिळाले आहे. सरकारच्या विविध प्रोत्साहनपर योजनांमुळे या क्षेत्राचा आलेख उंचावल्याचे निरीक्षण अहवालात नोंदवण्यात आले आहे.


राज्यातून होणाऱ्या निर्यातीनेही यंदा ५ लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. २०२४-२५ मध्ये ५.५७ लाख कोटींची निर्यात झाली असून, २०२५-२६ च्या नोव्हेंबरपर्यंतच ४ लाख कोटींच्या निर्यातीचा पल्ला गाठण्यात यश मिळाले. यात अभियांत्रिकी वस्तूंचा सर्वाधिक ३४ टक्के वाटा आहे. त्याखालोखाल रत्ने आणि आभूषणे २१ टक्के आणि प्लास्टिक उत्पादनांचा निर्यातीतील वाटा सर्वात कमी म्हणजे २ टक्के इतका आहे.


पुणे विभाग : सूक्ष्म आणि मध्यम अशा दोन्ही श्रेणीत पुणे विभागाने बाजी मारली आहे. १५.६१ लाख सूक्ष्म उपक्रमांतून येथे ५७.९१ लाख जणांना रोजगार मिळाला आहे. लघु उद्योगांच्या बाबतीत मुंबई शहर आणि उपनगर आघाडीवर असून येथे ६० हजार ६९८ उद्योग कार्यरत आहेत. लघु उद्योगांतून मिळणाऱ्या रोजगारात छत्रपती संभाजीनगर विभागाने ८.१८ लाखांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे. औद्योगिक नोंदणी आणि रोजगार निर्मिती या दोन्ही आघाड्यांवर अमरावती विभाग मात्र राज्याच्या सरासरीच्या तुलनेत मागे राहिल्याचे दिसून येते.

Comments
Add Comment

Mumbai Trees Damaged by Cables : टेलिकॉम कंपन्यांच्या केबल्सचा झाडांना विळखा

तातडीने उपाययोजना राबवून कारवाई करण्याची वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मागणी मुंबई : मुंबईत सध्या इंटरनेट,

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऐतिहासिक बिश्केक जाहीरनाम्यावर स्वाक्षरी

बिश्केक : २६ व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेत मंगळवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

Dagdusheth Halwai Ganpati : कारगिल, जम्मू, अयोध्या, राजस्थानसह सीमावर्ती भागात ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Dagdusheth Halwai Ganpati) भक्ती देशाच्या सीमेवर

BJP-MNS Clash : माहिममध्ये भाजप आणि मनसेचे कार्यकर्ते आमनेसामने - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवण्यावरून वाद

दादरमध्ये तणाव, कार्यकर्त्यांची धरपकड मुंबई : पुण्यात शासकीय महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो

MahaBhumi Stack : आता एका क्लिकवर मिळणार जमीन सर्च रिपोर्ट! महाराष्ट्रात महाभूमी स्टॅकचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही

Audi India : ऑडी इंडियाकडून ‘ऑल-न्यू ऑडी क्यू३’च्या बुकिंगला सुरुवात; ग्राहक १,००,००० रुपयांच्या टोकन रकमेसह ही एसयूव्ही बुक करू शकतात

मुंबई : ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज भारतात ऑल-न्यू ऑडी क्यू३ च्या बुकिंगला सुरुवात केली आहे. ही