इराणच्या हल्ल्यात अमेरिकेच्या संरक्षण व्यवस्थेचा चक्काचूर; मध्यपूर्वेतील तणाव वाढला

नवी दिल्ली : मध्यपूर्वेत वाढत चाललेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने केलेल्या हल्ल्यांमुळे अमेरिकेच्या काही महत्त्वाच्या लष्करी सुविधांना फटका बसल्याची माहिती समोर येत आहे. इराण आणि इस्त्रायल यांच्यातील युद्ध हे दिवसेंदिवस तीव्र होत चाललं आहे. या युद्धातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. एक हल्ला आणि अमेरिकेसारख्या महासत्तेची नाचक्की


महासत्ता अमेरिकेची डिफेन्स सिस्टीम ही प्रचंड मोठी आहे. आणि अमेरिकेच्या या ताकदीची चर्चा ही जगभर आहे. परंतु आता तीच ताकद इराणच्या एका हल्ल्याने ढासळली आहे.



कतारमधील अमेरिकन तळावर हल्ला


इराणकडून ड्रोनच्या मदतीने कतारमधील अल उदीद एअर बेस परिसरात तैनात असलेल्या अमेरिकन रडार प्रणालीवर निशाणा साधण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. सुमारे १.१ अब्ज डॉलर्स किंमतीची ही अर्ली वॉर्निंग प्रणाली गंभीररीत्या बाधित झाल्याचे वृत्त समोर आले आहे.


त्याचवेळी बहरीनमध्ये असलेल्या अमेरिकन नौदलाच्या पाचव्या ताफ्याच्या मुख्यालयाजवळील काही सॅटेलाइट कम्युनिकेशन सुविधांना नुकसान झाले आहे.



THAAD प्रणाली चक्काचूर


जगातील प्रगत क्षेपणास्त्र प्रतिकार यंत्रणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या THAAD प्रणालीलाही या घटनांमध्ये अपेक्षित यश मिळाले नसून जॉर्डनमधील मुवफ्फाक साल्टी एअर बेस तसेच यूएईतील काही ठिकाणी तैनात असलेल्या THAAD रडार यंत्रणांवर इराणकडून अचूक हल्ले करण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये सुमारे ३०० दशलक्ष डॉलर्स किमतीच्या उपकरणांचे नुकसान झाल्याची चर्चा आहे.



भारताच्या S-400 प्रणालीचा अनुभव


२०२५ च्या संघर्षात पाकिस्तानने चिनी उपग्रहांच्या मदतीने भारताच्या S-400 डिफेन्स सिस्टमचे लोकेशन शोधले होते. तरीही पाकिस्तानचे एकही ड्रोन किंवा क्षेपणास्त्र S-400 च्या जवळ पोहोचू शकले नाही. या



हल्ल्याची वेगळी रणनीती


चे मुख्य कारण म्हणजे भारतीय जवानांनी ही सिस्टम वेगाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवली, ज्यामुळे शत्रू गोंधळला. तज्ज्ञांच्या मते, THAAD प्रणाली मुख्यतः उंचावरून येणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी तयार करण्यात आली आहे. परंतु इराणने या वेळी लो-फ्लाइंग क्रूझ मिसाइल्स आणि आत्मघाती ड्रोन यांचा वापर करत वेगळी रणनीती अवलंबली.


यामुळे विविध दिशांनी आणि एकाच वेळी झालेल्या हल्ल्यांना रोखणे कठीण झाले. THAAD सोबत असलेल्या पॅट्रियट आणि आयर्न डोम सारख्या संरक्षण प्रणालींनाही मोठे आव्हान निर्माण झाल्याचे तज्ज्ञ सांगतात.



संभाव्य नुकसानाचा आढावा तज्ज्ञांनी सांगितले आहे


कतार: सुमारे १.१ अब्ज डॉलर्सची अर्ली वॉर्निंग रडार प्रणाली बाधित
बहरीन: नौदल तळाजवळील सॅटेलाइट कम्युनिकेशन सुविधा प्रभावित
जॉर्डन / यूएई: THAAD रडार प्रणालीला नुकसान


मध्यपूर्वेतील या घडामोडींमुळे जागतिक सुरक्षाव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून परिस्थितीवर आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे