'ई-चलान' वसुलीसाठी सक्ती केल्यास पोलिसांवरच होणार कारवाई; पोलीस महासंचालकांचे निर्देश

मुंबई : रस्त्यावरील वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर आकारल्या जाणाऱ्या ‘ई-चलान’च्या दंडाची वसुली करताना वाहनचालकांशी उद्धटपणे वागणे आणि दंड भरण्यासाठी सक्ती करणे आता पोलिसांना महागात पडणार आहे. प्रलंबित दंड भरण्यासाठी वाहनचालकांवर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करू नये, असे स्पष्ट निर्देश अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांनी राज्यातील सर्व पोलीस घटकांना दिले आहेत. या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आता थेट शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


राज्यात प्रलंबित ई-चलान वसुलीसाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. मात्र, या मोहिमेदरम्यान अनेक ठिकाणी पोलीस वाहनचालकांना रस्त्यात अडवून ‘दंड आत्ताच भरा, अन्यथा वाहन किंवा कागदपत्रे जप्त करू’ अशी दमदाटी करत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर गृह विभागाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. परिवहन मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पोलिसांच्या या वर्तनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.



'एसओपी'चे पालन अनिवार्य


 

वाहतूक विभागाने ई-चलान दंड वसुलीसाठी यापूर्वीच 'आदर्श कार्यप्रणाली' (एसओपी) जाहीर केली आहे. यानुसार, जर वाहनचालक स्वेच्छेने दंड भरण्यास तयार असेल, तरच तो स्वीकारावा. वाहन जप्तीसारखी कारवाई केवळ न्यायालयाच्या आदेशानेच करण्यात यावी. रस्त्यात वाहनचालकांना अडवून त्यांच्याशी उद्धटपणे बोलू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.



शिस्तभंगाची कारवाई करणार


 

ग्राउंडवर काम करणारे पोलीस कर्मचारी अनेकदा वरिष्ठ कार्यालयाने दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून जनतेला नाहक त्रास देत असल्याचे समोर आले आहे. यामुळे पोलिसांची जनमानसातील प्रतिमा मलिन होत असल्याचे नव्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. जे पोलीस अधिकारी किंवा अंमलदार या निर्देशांचे उल्लंघन करतील, त्यांच्याविरुद्ध तत्काळ शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी